Sanjay Raut: ईडीच्या उत्तरानंतर संजय राऊतांना जामीन मिळणार?

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर ईडीला उत्तर देण्याचे निर्देश
Sanjay Raut: ईडीच्या उत्तरानंतर संजय राऊतांना जामीन मिळणार?
Updated on

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मुंबईतल्या गोरेगाव पत्राचाळ मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सध्या संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत. संजय राऊतांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टाकडे अर्ज दाखल केला होता. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर ईडीला उत्तर देण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

ईडीच्या कोठडीत असलेले संजय राऊत यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए (PMLA) कोर्टात त्यांनी हा अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता राऊतांच्या या जामीन अर्जावर सुनावणी होणार नसून मुंबई सत्र न्यायालयाने ईडीला संजय राऊतांच्या जामीन अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ईडीने राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. राऊतांना मुंबई सत्र न्यायालयाने 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर ईडीला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने 16 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली असून याच दिवशी राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.