Sanjay Raut :"मी तक्रार करणार"; श्रीकांत शिंदेंनी सुपारी दिल्याच्या आरोपानंतर राजा ठाकूरची प्रतिक्रिया

शिंदे पितापुत्रांच्या वाढदिवसानिमित्त ठाकूरने ठाण्यात दोघांना शुभेच्छा देणारे बॅनर लावले होते, तसंच कबड्डी सामन्याचं आयोजनही केलं होतं.
Sanjay Raut Shrikant Shinde
Sanjay Raut Shrikant ShindeSakal
Updated on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिली, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी काल केला. ही सुपारी ठाण्यातला कुख्यात गुंड राजा ठाकूर याला दिल्याचंही राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

संजय राऊतांनी उल्लेख केलेला गुंड राजा ठाकूर याने आता आपल्यावरच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. राजा ठाकूर म्हणाला,"संजय राऊतांनी केलेला आरोप खोटा आहे. त्यांना हे आरोप स्वप्नात दिसले होते का? ते कोणाबद्दल काहीही बोलत आहे. संजय राऊतांना मला गुंड म्हणण्याचा अधिकार कोणी दिला? श्रीकांत शिंदे रिकामे बसलेत का? कोणताही मुद्दा नाही म्हणून काहीही बोलायचं का? बदनामी केल्यामुळे मी संजय राऊतांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहे."

Sanjay Raut Shrikant Shinde
Sanjay Raut : श्रीकांत शिंदेंनी जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपानंतर राऊतांच्या सुरक्षेत वाढ

असं आहे राजा ठाकूर - श्रीकांत शिंदे कनेक्शन!
२०११ साली केलेल्या एका खून प्रकरणातून जामिनावर सुटलेल्या ठाकूर याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्याशी संबंधित लोकांशी जवळीक वाढवली. या काळात राजा ठाकूरने खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशीही संपर्क वाढवला आणि ठाण्यात पुन्हा दहशत निर्माण करण्यात सुरुवात केली. दोन आठवड्यांपूर्वी ठाण्यात एकनाथ आणि श्रीकांत शिंदे या दोघांच्याही वाढदिवसानिमित्त ठाकूरने कबड्डी सामान्यांचं आयोजन केलं होतं. तसंच शहरभर शिंदे यांना शुभेच्छा देणारे बॅनरही लावले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()