मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्य़ेष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा नुकताच भाजपत प्रवेश झाला तसेच त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारीही दिली जाणार असल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर अशोक चव्हाणांना भाजपत घेऊन भाजपनं शहिदांच्या अपमानाची गॅरंटी दिली आहे, अशा शब्दांत ठाकरेंच्या शिवेसेनेनं सामनामधून भाजपला डिवचवलं आहे. (shivsena on ashok chavan guarantee to humiliate martyrs by narendra modi thackeray faction provoke bjp)
शहिदांच्या अपमानाची गॅरंटी
शिवसेनेनं म्हटलं की, मोदी नांदेडला आले होते तेव्हा त्यांनी आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करत अशोक चव्हाण यांनी शहिदांचा अपमान केला असल्याचं म्हटलं होतं. तसेच चव्हाण यांना घरी पाठवा असं नांदेडच्या जनतेला आवाहन केलं होतं. चव्हाण हे लीडर नसून डीलर आहेत, असा आरोपही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. (Latest Marathi News)
पण आज त्याच डीलरच्या स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून त्यावर पताका चिकटवण्याचं काम फडणवीस-मोदी करत आहेत. खरंतर मोदींनी शहिदांच्या अपमानाची दिलेली ही गॅरंटी आहे. त्यामुळं शहीद भाजपला माफ करणार नाहीत, अशा कठोर शब्दांत ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला डिवचलं आहे.
मोदींनी दिलेली अब की बार चारसौ पार ही गर्जना प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजपकडून इतर पक्षातील भ्रष्ट नेत्यांना सोबत घेतलं जात आहे. पण या शक्तिमान भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊनही ते जेमतेम दोनशेचा आकडा पार करु शकतील, असं वातावरण सध्या देशात आहे.
पाप धुण्यासाठी पूर्वी गंगा स्थान केलं जायचं पण आता भाजपच हीच गंगोत्री झाली आहे. चव्हाण कुटुंबियांच्या रक्तात काँग्रेस होती तरीही ते भाजपसोबत गेले. भाजपच्या धुलाई यंत्रानं त्यांना वैचारिक निष्ठेपेक्षा आकर्षित केलं आहे. (Marathi Tajya Batmya)
मुंबईत कफ परेड या उच्चभ्रू भागातील शहीदांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर ३२ मजली आदर्श इमारत उभी राहिली. त्यातील शहिद पत्नींचे फ्लॅट हडपण्याचा प्रकार घडला. यात चव्हाण कुटुंबियांचे पाच-सहा फ्लॅट होते, तसेच इतरही अनेक राजकारण्यांची यात गुंतवणूक होती. यावरुन मोदींनी नांदेडमध्ये येऊन चव्हाण यांनी शहिदांचा अपमान केला असं सांगत त्यांना निवडून न देण्याचं आवाहन केलं होतं. पण आता तेच भाजपत गेल्यानं अशोक चव्हाण चौकीदार कसे होऊ शकतात? याचं उत्तर देशाला मिळायला हवं, असा सवालही शिवसेनेनं केला आहे.
भाजपनं कारगील शहिदांच्या विधवा पत्नींच्या अपमानाबाबत पलटी मारली असून नुकतीच अधिवेशनात श्वेतपत्रिका काढून त्यात आदर्श घोटाळ्यासंबंधीचा विशेष उल्लेख केला. त्यानंतर अशोक चव्हाण भाजपवासी झाले. मग आदर्श घोटाळ्यात शहिदांचा अपमान झाला त्याचं काय झालं? भाजपनं यासंबंधी ठोकलेली बोंब खोटी होती का? असाच प्रकार मोदींनी जेव्हा ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याची तुतारी फुंकली तेव्हा पुढच्या चोवीस तासांत अजित पवार काकांच्या पाठीत खंजीर खुपसून भाजपसोबत सत्तेत भागीदार बनले, असंही ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.