येत्या जुलै महिन्यात मराहाराष्ट्रातील सहा राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. यातील पाच जागांवरील उमेदवारांच्या नावाची यादी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, सहाव्या जागेवरून राज्यात राजकारण रंगलंय. राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे छत्रपती यांची टर्म संपली आहे. आता स्वराज्य नावाच्या संघटनेमार्फत त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत राज्यातील सर्व आमदारांना पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रवादीने संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं. मात्र शिवसेनेला अद्याप हा प्रस्ताव मान्य नाही. (Sambhaji Raje Chhatrapati on Rajyasabha)
मातोश्रीवर येऊन शिवबंधन बांधा आणि पठिंबा मिळवा, असा निरोप मुख्यमंत्र्यांनी पाठवल्याची महिती मिळत आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत संभाजीराजेंना संधी देण्यात त्यामुळे राजकारण आणखी तापणार असून संभाजीराजेंनी ही ऑफर अद्याप स्वीकारलेली नाही. त्यामुळे शिवसेनेने प्लॅन बी अॅक्टिव्ह करत आणखी तीन नावांचा विचार सुरू केला आहे. (Maharashtra Rajyasabha Candidates 2022)
महाविकास आघाडीत सध्या सर्वाधिक जागा शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे राज्यातील सहाव्या जागेसाठी आता शिवसेनेकडून ग्रामीण भागातील नेत्यांना संधी मिळू शकते.
मंत्री उदय सामंत, खासदार अनिल देसाई आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी संभाजीराजेंसोबत चर्चा केली. याच वेळी त्यांना सेनेत येण्याचं अधिकृत निमंत्रण देण्यात आलंय. मात्र, संभाजीराजेंनी अद्याप होकार कळवलेला नाही. आज १२ वाजेपर्यंत त्यांच्या प्रतिसादाची अपेक्षा शिवसेनेला आहे. त्यामुळे नकार आल्यास शिवसेनेचे नियोजन सुरू केलं आहे. आता अपक्ष आमदारांनाही सोबत घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे.
तीन नावांची चर्चा कायम
अपक्ष लढवण्याच्या निर्णयावर संभाजीराजे कायम आहेत. त्यामुळे सेनेतील अन्य नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. सेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचं नाव आघाडीवर आहे. राज्यातील १४ मनपा निवडणुकांमध्ये औरंगाबादचाही समावेश आहे. मराठवाडा सेनेचा बालेकिल्ला असताना एमआयएमला प्रत्युत्तर देण्यासाठी खैरे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.
याशिवाय ठाकरे कुटुंबीयांच्या सर्वात जवळचे आणि मुख्यमंत्र्यांचा उजवा हात म्हणून ओखळले जाणारे मिलिंद नार्वेकर यांचंही नाव चर्चेत आहे. सध्या दिल्लीत संजय राऊत एकहाती किल्ला लढवत आहेत. त्यांना नार्वेकरांची साथ मिळाल्यास दिल्लीत सेनेचा भगवा बुलंद कऱण्यास मदत होईल. आणि शिवसेनेचं नेटवर्किंग वाढण्यास लाभ होईल.
पुण्यातील शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावाची चर्चाही रंगली आहे. याआधी त्यांनी ग्रामीण पुण्यात वळसे पाटील यांना प्रत्युत्तर देत शिवसेना वाढण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीला आव्हान देण्यासाठी ते कायम पुढे असायचे. पुण्यातील जिल्हा बँकेपासून पंचायत समित्यांपर्यंत राष्ट्रवादीची सत्ता आहे.
पवार फॅक्टरला तोंड देण्यासाठी आणि अमोल कोल्हे यांच्या विरोधात पुन्हा एकदा आढळराव यांना संधी मिळू शकते. अमोल कोल्हे यांची छत्रपतीची प्रतिमा आणि त्या भूमिकेतील पात्र सर्वसामान्यांचा आजही भावतं. संभाजीराजेंना सेनेने उमेदवारी न दिल्यास त्यांचे समर्थक शिवसेना ही मराठा विरोधी आहे, असा प्रचार करू शकतात. त्याला उत्तर देण्यासाठी आढळराव यांच्या नावाचा पर्याय योग्य ठरेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.