मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या प्रकरणात कोर्टाने समन्स बजावलं आहे. त्यामुळे राऊतांना 6 ऑगस्टला शिवडी कोर्टात हजर राहावं लागणार आहे. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी राऊतांवर अब्रू नुकसानीचा दावा केला होता. या प्रकरणात त्यांना याआधी कोर्टाने अटक वॉरंट जारी केला होता.
(Sanjay Raut Court Summons)
किरीट सोमय्या यांच्या पत्नीने मानहानी प्रकरणात राऊतांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राऊतांना समन्स बजावण्यात आलं असून 6 ऑगस्टला संजय राऊत यांना कोर्टात हजर राहून या प्रकरणात दोषी आहेत की नाहीत हे कोर्टाला सांगावं लागणार आहे.
दरम्यान, राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यानंतर त्यांनी अब्रू नुकसानीचा दावा केला होता. याच प्रकरणात संजय राऊत यांच्याविरोधात याआधीही दोन वेळा अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. संजय राऊतांनी कुठलाही पुरावा नसताना मेधा सोमय्या यांच्यावर आरोप केले होते त्यामुळे मेधा सोमय्या यांनी राऊतांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला होता. त्यानंतर राऊतांच्या अडचणीत वाढ होत गेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.