'२०२४ नंतर असे *** संपतील', राऊतांनी भाजपसाठी पुन्हा वापरली आक्षेपार्ह भाषा

sanjay raut use offensive word for bjp
sanjay raut use offensive word for bjp sakal
Updated on

मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Telangana CM K. Chandrashekhar Rao) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray) भेट घेणार आहेत. या भेटीसाठी सोनिया गांधींची परवानगी घेण्यात आली, असं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले होते. त्यावर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिले आहे. यावेळी राऊतांनी भाजपसाठी परत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला.

sanjay raut use offensive word for bjp
मोदी सरकारमधील मंत्र्याविरोधात चित्रा वाघ आक्रमक, कारवाईची मागणी

केसीआर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी सोनिया गांधींकडून परवानगी घेण्यात आली का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला होता. याबाबत संजय राऊतांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, '' असं कोण म्हणालं? देशात असे *** लोक खूप आहेत. अशा लोकांवर प्रश्न विचारणं शोभत नाही. राजकारण देशातील अशा *** लोकांना २०२४ नंतर संपवून टाकेल. २०२४ नंतर देशातील राजकारण अत्यंत पारदर्शक असेल. १० मार्चनंतर आपल्याला हे समजून येईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी भेटायला येत असेल तर त्यांचा अशाप्रकारे अपमान करणे हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. अशा *** लोकांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवते'', असं संजय राऊत म्हणाले.

देशात मोठे राजकीय बदल होणार आहेत. बिगर भाजपशासित मुख्यमंत्र्यांना केंद्राकडून त्रास दिला जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सर्वांनी मिळून भूमिका घेणं गरजेचं आहे. आजच्या बैठकीमध्ये राजकीय चर्चा होणार आहे. यामध्ये काँग्रेसची भूमिका देखील महत्वाची आहे. तसेच शरद पवार आमचे मार्गदर्शक आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.