Anil Babar Passed Away: शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन; एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख

Anil Babar Passed Away: एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे.
Anil Babar Passed Away
Anil Babar Passed AwayEsakal
Updated on

शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झालं आहे. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. अनिल बाबर हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. न्यूमोनिया झाल्याने अनिल बाबर यांच्यावर उपचार सुरू होते.

सांगलीच्या खानापूर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते. राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटलांचा अनिल बाबर यांनी २०१९ ल३ पराभव केला होता. अनिल बाबर यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असा राजकीय प्रवास आहे. अनिल बाबर हे ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. १९९०, १९९९, २०१४, २०१९ ला आमदारकीला ते निवडून आले होते.

Anil Babar Passed Away
Param Bir Singh : परमबीर सिंह यांच्याविरोधातील तपास बंद करण्याचा सीबीआयचा अहवाल; पुरावे नसल्याचं दिलं कारण

शिवसेनेत फूट पडल्यापासून अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. महाविकास आघाडीवर आपली नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला सुरवातीपासून खंबीर साथ दिली होती. गुवाहाटीमध्येही अनिल बाबर एकनाथ शिंदे यांच्या सोबत होते.

Anil Babar Passed Away
Maratha VS OBC: अधिसूचनेचा ओबीसींवर काय परिणाम होणार?, सगे सोयरे हा शब्द...; राष्ट्रीय OBC महासंघाच्या अध्यक्षांनी स्पष्ट सांगितलं

दरम्यान, ठाकरे गटाकडून अपात्रतेप्रकरणी दिलेल्या नावाच्या यादीत अनिल बाबर यांच्या नावाचाही समावेश होता. अनिल बाबर हे 2019 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यांनी अपक्ष उभा राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. आमदार अनिल बाबर चार वेळा आमदार झाले आहेत.

Anil Babar Passed Away
Manoj Jarange-Patil: मनोज जरांगे ओबीसीमधूनच आरक्षणावर ठाम का?, टेक्निकल गोष्ट समजून घ्या...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.