तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. उदयनिधी स्टॅलिन यांच्या वादगृस्त वक्तव्याचे पडसाद सर्वत्र पाहायला मिळत असून त्यांच्या वर देशभरातून टीका केली जात आहे. आता सनातन धर्माबद्दल केलेल्या य वक्तव्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, मी ते विधान ऐकले आहे. वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत असलेल्या लोकांची विधाने देखील मी ऐकली आहेत. उदयनिधी स्टॅलिन हे मंत्री आहेत आणि त्यांच्या विधानाचे कोणीही समर्थन करणार नाही. तुम्ही इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहात त्यामुळे अशी विधाने करणे टाळावे...हे डीएमकेचं मत असू शकते किंवा त्यांचे वैयक्तिक मत असू शकतं. या देशात सुमारे ९० कोटी हिंदू राहतात आणि इतर धर्माचे लोकही या देशात राहतात... त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकत नाहीत..."
यामुळे देशाचे वातावरण बिघडलं आहे, तुमचं वयक्तीक मत तुमच्यापुरतं ठेवा. भाजपला असं कुठलं शस्त्र मिळू नये जे वापरून ते आपल्यावर हल्ला करत राहतील. आम्ही आमचं म्हणणं मांडलं आहे. एमके स्टॅलिन मोठे नेते आहेत, ते आमच्यासोबत युद्धात उतरले आहेत. स्टॅलिन यांच्या सहकाऱ्यांनी थोडं सांभाळून बोलावं, जेणेकरून इंडिया आघाडीसमोर कुठली अडचण येणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या डीएमकेचे नेते उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया अशा आजारांशी केली. यावरून भाजपकडून उदयनिधी यांच्यासह इंडिया आघाडीवर टीका करण्यात येत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.