Uday Samant: चार पावलं मागे आलो, याचा अर्थ भविष्यात...; नारायण राणेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सामंत काय म्हणाले?

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha 2024: नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने उदय सामंत यांनी सामोपचाराची भूमिका घेतली आहे.
Uday Samant AND rane
Uday Samant AND rane
Updated on

मुंबई- भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी अखेर जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघासाठी शिंदेची शिवसेना आग्रही होती. विशेषत: शिवसेना नेते उदय सामंत यांनी आपले बंधू किरण सामंत यांच्यासाठी जोर लावला होता. पण, आता नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने उदय सामंत यांनी सामोपचाराची भूमिका घेतली आहे. (Uday Samant say after Narayan Rane candidature was announced)

उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काही गोष्टींमध्ये चार पावले मागे आलो याचा अर्थ असा नाही की आम्ही भविष्यात पुढे काही करणार नाही. खासदार किरण सामंत यांना खासदार करायचं आहेच. महायुतीमध्ये तेढ निर्माण होऊ नये, यासाठी माघार घेत आहे, असं उदय सामंत म्हणाले आहेत. (ratnagiri sindhudurg lok sabha 2024)

Uday Samant AND rane
Loksabha Election: भाजपची १३वी यादी जाहीर! रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार ठरला; अखेर नारायण राणेंचं नाव जाहीर!

रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीमध्ये बरीच चर्चा सुरु होती. किरण सामंत यांनी रात्री एक ट्वीट केलं होतं. यात ते म्हणाले होते की, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावेत यासाठी मी माघार घेत आहे. यासंदर्भात उदय सामंत यांनी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपण माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं.

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आली तरी उमेदवार जाहीर झाला नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. नारायण राणे यांना जरी उमेदवारी जाहीर झाली तरी प्रमाणिक काम करु आणि काही काळ थांबावे लागेल तरी आम्ही थांबू. उद्या फाँर्म भरताना आम्ही नारायण राणे यांच्या सोबत ताकदीने राहू. महायुतीमध्ये कुठेही तिडा निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. किरण सामंत यांचा पूर्णपणे मानसन्मान महायुतीमध्ये केला जाईल, असं सामंत म्हणाले

Uday Samant AND rane
Loksabha Election: पश्चिम महाराष्ट्रात महायुती, मविआचं जोरदार शक्तीप्रदर्शन, अस्तित्वाची लढाई असलेल्या जागांवर अर्ज दाखल होणार

पुनर्वसनावर आम्ही अवलंबून नाही. आमच्यात ताकद आहे. कोणतंही आश्वासन न घेता किरण सामंत माघार घेत आहेत. त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. भाजपच्या एका नेत्याने कमळ चिन्हावर लढावं असं सांगितले होते. एखादा लढला असता आणि खासदार झाला असता, पण किरण सामंत यांनी असं काही केलं नाही, अशी पुष्टी उदय सामंत यांनी जोडली. (Lok Sabha Election News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.