CM Foreign Tour: आदित्य ठाकरेंच्या पोस्टनंतर परदेश दौरा रद्द झाला का? उदय सामंत म्हणाले...

Uday Samant Aaditya Thackeray
Uday Samant Aaditya ThackeraySakal
Updated on

मुंबई- शिंदे सरकारच्या मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावरुन ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय. मंत्र्यांच्या परदेश दौऱ्याबाबतचा आर्थिक तपशील त्यांनी सादर केला. तसेच मागच्या सरकारपेक्षा आम्ही खर्च कमी केला असल्याचं ते म्हणाले.

आदित्य ठाकरे यांच्या पोस्टनंतर दौरा रद्द करण्यात आला असा आरोप करण्यात आला होता. यावरही उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं. आदित्य ठाकरे यांच्या पोस्ट आधीच परदेश दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं आहे.

२३ तारखेला मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला. त्यांची भूमिका अशी होती की, नागपूरला ढगफूट झाली. शेतकऱ्यांचा विषय आहे. आरक्षणाचा मुद्दा आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात राहणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. कोणाच्या ट्विटमुळे हा दौरा रद्द झाला नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

Uday Samant Aaditya Thackeray
Deepak Kesarkar : आदित्य ठाकरे खूपच लहान, त्यांच्याविरोधात बोललो तर ठाकरेंना परवडणार नाही; केसरकरांचा स्पष्ट इशारा

२०२३ मध्ये दौऱ्यावर ३२ कोटी खर्च झाला आहे. सगळ्यात मोठा खर्च १६ कोटी ३० लाख पेवेलियनसाठी झाला. येथील आणि परदेशातील खर्च वेगळा असतो. २०२३ चे पेवेलियन ४००० स्क्वेर फूटाचं होतं. २०२२ चे पेवेलियन १४०० स्क्वेर फूटाचं होतं, त्यासाठी ३ कोटी बावीस लाख खर्च आला होता, अशी माहिती सामंत यांनी दिली.

Uday Samant Aaditya Thackeray
Sharad Pawar : उद्योगमंत्री उदय सामंत शरद पवारांच्या भेटीला; भेटीचं कारण आलं समोर...

पेवेलियन २०२२ च्या तुलनेत चार पटीने मोठे असल्याने १६ कोटी रुपये खर्च झाला. आंतरराष्ट्रीय पातळीवर जी प्रसिद्धी केली गेली त्याला २ कोटींचा खर्च आला, मागच्या सरकारने २०२२ मध्ये यासाठी ३ कोटी ४४ लाख खर्च केला होता. त्यावेळी आम्ही काही बोललो नाही. त्यावेळी गेलेले शिष्टमंडळ छोटं होतं. आणि यावेळी गेलेलं शिष्टमंडळ मोठं होतं, असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं.

Uday Samant Aaditya Thackeray
Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचे मुंबई महानगरपालिकेवर आरोप ; म्हणले पालिका... !

आदित्य ठाकरे यांनी परदेश दौऱ्यावरुन सरकारवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, जनतेच्या पैशांवर मंत्र्यांचे परदेश दौरे होत आहेत.अनेकांना फॉरेन ट्रिप करायला आवडतं.नेते ही सुट्टी समजायला लागले आहेत. मुख्यमंत्री यांचा परदेश दौरा होणार होता.

आम्ही प्रश्न विचारल्यानंतर 30 मिनिटात मंत्रालयातून दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. आमच्या ट्विटनंतर दौरा रद्द करावा लागला, जनतेचा पैसा आम्ही वाचवला. डर अच्छा है, अशी टीका ठाकरेंनी केली होती. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.