'जितेंद्र आव्हाडांनी तोंड सांभाळून बोलावं'; अंबादास दानवेंनी मांडली पक्षाची भूमिका

Jitendra Awhad statement on ram: विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी भाष्य केले आहे. जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य त्यांचं खासगी आहे
ambadas danve
ambadas danve
Updated on

मुंबई- विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी भाष्य केले आहे. जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य त्यांचं खासगी आहे. आम्ही त्याचं समर्थन करत नाही. यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज नाही. पण, आम्ही त्यांच्या वक्तव्याचं निषेध करतो, अशी भूमिका दानवे यांनी मांडली आहे.

प्रभु श्रीराम यांच्याविषयी सर्वांनी सांभाळून बोललं पाहिजे. प्रभु श्रीराम या देशाचे आदर्श आहेत. एक आदर्श पुरुष म्हणून, महापुरुष म्हणून सर्व देश त्यांचा आदर करतो. अशा आदर्शाविषयी बोलताना तोंड सांभाळून बोलावं असं मला व्यक्तिगतरित्या तरी वाटतं, असं म्हणत अंबादास दानवे यांनी आव्हाडांना सुनावलं आहे.

ambadas danve
Jitendra Awhad On Ram: श्री रामाच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड पक्षातही एकाकी; रोहित पवारांचा घरचा आहेर

हिंदुत्व काय असतं हे आम्हाला शिकवण्याची गरज नाही. गौमांस खाण्याचे समर्थन करणारे काही भाजपचे नेते आहेत. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय हे आम्हाला माहिती आहे. रिजिजू काय बोलले होते हे देखील आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे आम्हाला कोणी हिंदूत्व शिकवू नये. गणपती, चतुर्थीला मटन-कोंबडी कापणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, असं म्हणत दानवे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

पुणे-मुंबईमध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन सुरु असून भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये आव्हाडांविरोधात भाजप नेते राम कदम यांनी तक्रार दाखल केली आहे. आव्हाडांना अटक केल्याशिवाय शांत बसणार नाही अशी भूमिका राम कदम यांनी घेतली आहे.

ambadas danve
Jitendra Awhad: महात्मा गांधी ओबीसी असल्यानं त्यांची हत्या; जितेंद्र आव्हाड यांचा दावा

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्यभरातील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नाशिकमध्ये देखील आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली जाण्याची शक्यता आहे. राम हा मांसाहारी होता, बहुजणांचा होता, असं वक्तव्य आव्हाडांनी केलं होतं. यावरुन वाद निर्माण करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.