Maharashtra Politics: तुमचा 'युज अँड थ्रो'च होणार; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाच्या आमदारांना इशारा

Shivsena Uddhav Thackeray on Eknath shinde group mla bjp maharashtra politics
Shivsena Uddhav Thackeray on Eknath shinde group mla bjp maharashtra politics
Updated on

मुंबई : केंद्रीय निवडणूक शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवलं तसेच शिवसेना नाव वापरता येणार नाही असा निर्णय दिल्यानंतर शिंदे गट आणि शिवसेना एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे गटातील आमदारांवर ताशेरे ओढले जात आहेत. भाजप या बंडखोर आमदारांचा उपयोग करून घेत असल्याचे उद्धव ठाकरे त्यांच्या फेसबुक लाइव्हमध्ये बोलताना म्हणाले.

उद्धव ठाकरें यांनी त्यांच्या संबोधनात शिंदे गटाच्या आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. ठाकरे म्हणाले की, यांना काय साधयचं आहे, जो मिंधे गट आहे त्यांचा भाजप कसा उपयोग करुन घेतोय ते त्यांना कळत नाहीये. याचं उदाहरण देताना ठाकरे म्हणाले की, टीव्हीवर सरबताची जाहीरात येते. अमिताभजी सरबताची जाहीरात करतात. ती जाहीरात पाहूण आपण चांगल्या दुकानातून किंमत देऊन ती बाटली विकत घेतो, बाटली घरी आणल्यानंतर ती जपून वापरतो फ्रीजमध्ये ठेवतो, पण सरबत संपल्यानंतर ती कचऱ्याच्या डब्यात टाकून देतो. तसच यांचं होणार आहे. यांचा उपयोग आता संपत चालला आहे. चिन्ह गोठवून झालं आता यांचा आणखी काय राहीलं आहे उपयोग काय राहीला आहे?, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Shivsena Uddhav Thackeray on Eknath shinde group mla bjp maharashtra politics
Amruta Fadanvis: भाजपची साथ सोडली...; अमृता फडणीसांचे ट्विट चर्चेत

उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली आहे. तुम्ही मुख्यमंत्री झाला, पक्ष फोडला ते ठीक आहे. पण आता यांना पक्षप्रमुख व्हायचं आहे. हे आती होतंय, असं म्हणत उद्धव म्हणाले आहेत.

Shivsena Uddhav Thackeray on Eknath shinde group mla bjp maharashtra politics
Shivsena: त्यांना धनुष्यबाणाबद्दल प्रेम नव्हतंच, त्यांना फक्त...; चिन्ह गोठवल्यानंतर केसरकरांचा हल्लाबोल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.