मुंबई : शिवसेनेच्या एकूण खासदारांपैकी १४ खासदार शिंदे गटात दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान हे चौदा खासदार शिंदे गटाच्या बैठकीसाठी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते अशी माहिती 'साम' या वृत्तवाहिनीने दिली आहे.
(Will Shivsena14 Member of Parliament Join Eknath Shinde Group)
शिवसेनेच्या खासदरांपैकी ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत, गजानन किर्तीकर, अरविंद सावंत हे वगळता बाकीचे १४ खासदार शिंदे गटाच्या ट्रायडंट हॉटेल येथील बैठकीत ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असल्याचं सांगितलं जात आहे.
या माहितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेनेच्या एकूण खासदारांपैकी तब्बल १४ खासदार शिंदे गटात गेल्यामुळे सेनेला मोठा दणका बसणार आहे. तर राजन विचारे, अरविंद सावंत, ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत, गजानन किर्तीकर हे खासदार शिवसेनेतच राहणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या खासदारांकडून कोणतीही प्रतिक्रिया आल्या नाहीत. ही बैठक संपल्यावर खासदारांची प्रतिक्रिया येणार असून त्यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीआधी काही खासदारांनी शिवसेनेला पत्र लिहित भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवसनेने मुर्मू यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. तर उपराष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेने यूपीएला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. खासदारांनी भाजपला पाठिंबा देण्याची मागणी केल्यावर ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा केल्या जात होत्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.