भुजबळांकडे पेढे खायला अन् प्रफुल्ल पटेलांकडे जेवायला जाणार; उद्धव ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरुन सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ आणि पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली.
shivsena uddhav thckeray statement on ed chhagan
shivsena uddhav thckeray statement on ed chhagan eSakal
Updated on

नागपूर- उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरुन सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ आणि पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली. भुजबळांच्या घरी पेढे खाण्यासाठी जावं लागेल अन् त्यानंतर प्रफुल्ल पटेलांकडे जेवण्यासाठी जाऊ, असा टोला त्यांनी लगावला. सक्तवसुली संचालनालयाने भुजबळ यांना दिलासा दिला आहे. यावरुन ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय.

आजचा दिवस आनंदाचा आहे. आम्ही छगन भुजबळ यांच्याकडे पेढे खाण्यासाठी जाणार आहोत. ईडीने भुजबळांवरील चौकशी बंद केली आहे. त्यांना काही वर्ष तुरुंगात ठेवल्यानंतर. जामीनावर बाहेर आहात अशी दमदाटी केल्यानंतर आता भुजबळांनी काय चमत्कार केला हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत, असं ठाकरे म्हणाले.

shivsena uddhav thckeray statement on ed chhagan
Uddhav Thackeray : ठाकरेंचा जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीला पाठिंबा; म्हणाले, "मी मुख्यमंत्री असतो तर..."

उद्धव ठाकरे यांनी प्रफुल्ल पटेल यांनाही टोमणा मारला. आम्ही प्रफुल्ल पटेल यांच्या घरी जेवायला जाणार आहोत. पण, त्यांना विनंती करणार आहोत की मिर्ची कम जेवण द्या, असं म्हणत त्यांनी मिश्किल टिप्पणी केली.

छगन भुजबळांना कोणती जडीबुटी मिळाली, कोणता बाबा मिळाला आणि चमत्कार झाला. त्यामुळे ईडी मागे गेली. मागे ईडीने तर म्हटलं की कशासाठी आरोप केले हे देखील माहिती नाही. त्यामुळे ही जडीबुडी सगळ्यांना दे अशी प्रार्थना मी देवाकडे करतो, असं ठाकरे म्हणाले.

shivsena uddhav thckeray statement on ed chhagan
Sushma Andhare News: उद्धव ठाकरेंमुळे निवडून आलेले गाताहेत मोदींचे गुणगान : सुषमा अंधारे

सर्व काही खोटेपणा सुरु आहे. वाटेल तेव्हा बदनाम करायचं. पण, त्यांच्याकडे आलं की त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यायचं. हे उघड-उघड थोतांड सुरु आहे. हे आमचं हिंदूत्व नाही. यांचं थोतांड हिंदूत्व आम्हाला मान्य नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.