अजित पवारांना मी समजदार समजत होतो, पण आता...; उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

hivsena udhhav thackeray criticize ajit pawar
hivsena udhhav thackeray criticize ajit pawar
Updated on

मुंबई- अजित पवार यांना मी त्यातल्या त्यात समजदार समजत होतो. मी संघनायक होतो तेव्हा हे विकेट किपर होते, माझं काय चुकतंय हे सांगायला ते संघात नव्हते का? असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली. आरक्षण न टिकण्याची जबाबदारी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांची असल्याचं अजित पवार म्हणाले होते. यावर ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. (shivsena udhhav thackeray criticize ajit pawar )

मी संघनायक होतो, पण हेही संघात होते. मग यांनी मार्गदर्शन का केलं नाही. कोणताही वकील बदलला नव्हता,आरक्षणासाठी अनेक प्रयत्न केले होते. मागील अपयशाचं खापर माझ्यावर फोडणार असाल, तर आता झालेल्या लाठीचार्जची तुम्ही जबाबदारी घ्यावी. मी याआधी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला होता. पण, आता मला वाटतं एक फूल दोन हाफ त्यांच्या टीमने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

हे तीन तिघाडी सरकार आहे. हे सरकार निर्घुणपणे काम करतंय. कोणीही न्याय हक्कासाठी रस्त्यावर यायचं नाही. आल्यास आम्ही लहान मोठं कोणी पाहणार नाही. महिलांना घरास घुसून मारलं जाईल. इतक्या निर्घुणपणे वागलेलं सरकार मला माहिती नाही. बारसुमध्येही लाठीचार्ज झाला होता. हे सरकार हिंदूत्ववादी असल्याचं मानतं, पण वारकऱ्यांवर लाठीचार्ज करता, अशी टीका केली.

hivsena udhhav thackeray criticize ajit pawar
Maratha Reservation : काठीचे व्रण लक्षात ठेवा...; राज ठाकरेंचे मराठा आंदोलकांना आवाहन

सरकारचं नेमकं काय चालू आहे. त्यांना न जुमानता पोलिस लाठीचार्ज करत आहेत का? याचा अर्थ सरकारचं पोलिसांवर कंट्रोल नाही. ते सरकार चालवण्याच्या लायकीचे नाहीत. त्यांची सरकार चालवण्याची कुवत नाही असं सिद्ध होतं, अशी टीका ठाकरेंनी केली. आंदोलकांना मी भेटलोय. एका शाळकरी मुलाला मारहाण झाली.घटनेची जबाबदारी कोण घेणार, काठीला जबाबदार धरणार काय? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

hivsena udhhav thackeray criticize ajit pawar
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे जालन्यासाठी रवाना ; मराठा आंदोलकांची घेणार भेट

देवेंद्र फडणवीस यांचे ज्ञान तोकडं असल्याचं मला माहिती नव्हतं. वटहुकूम काढण्याचा अधिकार केंद्राचा आहे. केंद्र सरकारने तो काढायला हवा. फडणवीस मंत्रालयाच्या आजूबाजूला फिरकायच्या देखील लायकीचे नाहीत. मला वाटतं फडणवीस यांना घटनेचा अभ्यास नाही. संसदेत कायदा व्हायला हवा. त्यामुळे विशेष अधिवेशन घेऊन ही तरतूद करावी, असं ठाकरे म्हणाले.

hivsena udhhav thackeray criticize ajit pawar
Maratha Reservation : संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा, धनगर आरक्षणाचा प्रश्न कायमचा सोडवा; रोहित पवारांची मागणी

तरी फडणवीस यांना वाटत असेल की मी निर्णय घेतला नाही, तर माझी चूक झाली. आता तुम्ही वटहुकूम काढा आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदला अशी टिप्पणी त्यांनी केली. आंदोलकांनी संयम बाळगायचा आणि सरकारने दांडगाई कराययी असं होऊ शकत नाही, असं ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.