Shivsena VS Congress: काँग्रेस शून्य आहे असं मी म्हटलं नाही, मात्र...; संजय राऊत यांचं स्पष्टीकरण

शिवसेनेला 23 जागा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी काल म्हटले होते. याला संजय राऊत यांनी देखील उत्तर दिले होते. त्यानंतर काँग्रेस विरुद्ध शिवसेना असं युद्ध रंगल होतं.
Shivsena VS Congress
Shivsena VS Congress
Updated on

Shivsena VS Congress: इंडिया आघाडीतील घटक पक्ष जागावाटपाचे वेगवेगळे दावे आहेत. काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक युद्ध रंगल आहे.  शिवसेना खूपच कमकुवत झाली आहे. 23 जागा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी काल म्हटले होते. याला संजय राऊत यांनी देखील उत्तर दिले होते. त्यानंतर काँग्रेस विरुद्ध शिवसेना असं युद्ध रंगल होतं.

काय म्हणाले होते संजय राऊत -

“महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष शिवसेना आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी आमची चर्चा चांगली सुरू आहे. आम्ही महाराष्ट्रात लोकसभेसाठी नेहमीच २३ जागा लढवल्याचं म्हटलं होतं. जिंकलेल्या जागांवर नंतर चर्चा करू, असे आम्ही आधी ठरवले होते. महाराष्ट्रात काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. महाराष्ट्रात काँग्रेसची सुरुवात शून्यातून होईल पण महाविकास आघाडीत काँग्रेस हा आमचा महत्त्वाचा साथीदार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र काम करतील आणि आम्हाला, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस हायकमांडला कोणतीही अडचण नाही."

संजय राऊत यांच स्पष्टीकरण-

खासदार संजय राऊत म्हणाले, "मी म्हटलं होतं की काँग्रेसला शून्यातून सुरुवात करावी लागेल, काँग्रेस शून्य आहे असं मी म्हटलं नाही. महाराष्ट्रात काँग्रेसचा एकही खासदार नाही. आमच्याकडे 18 खासदार होते पण काही बाकी आहेत आणि आमचे आता 6 खासदार आहेत. आमची आघाडी काँग्रेससोबत आहे आणि महाविकास आघाडी जवळपास 40 जागा जिंकेल. भाजपला जिंकण्यासाठी ईव्हीएमची गरज आहे, ते एकटे जिंकू शकत नाहीत. त्यांची युती ईव्हीएमशी आहे..."

Shivsena VS Congress
Modi Guarantee: "मोदींची गॅरंटी हा निवडणूक विजयाचा फॉर्म्युला नव्हे तर..."; PM मोदींनी स्पष्टच सांगितलं

यापूर्वी, काँग्रेस नेते संजय निरुपम म्हणाले होते की, पक्षातील फुटीमुळे पुरेशा उमेदवारांची कमतरता असल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाला मोठे आव्हान आहे. शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर, राज्यात स्थिर मते असलेला मोठा जुना पक्ष हा एकमेव पक्ष आहे.

Shivsena VS Congress
Ayodhya Ram Mandir : इंडिया आघाडीसमोर धर्मसंकट! अयोध्येला जाण्यावरुन एकमत होईना, ममतांचा नकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.