Abdul Sattar: अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढणार? अकोल्यातील कथित धाडींबाबत धक्कादायक खुलासा

अकोल्यात कृषीमंत्र्यांच्या नावावर कृषी विभागाच्या कथित पथकानं एमआयडीसीमध्ये काल धाडी टाकण्यात आल्या
Abdul Sattar
Abdul SattarTeam eSakal
Updated on

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावे अकोल्यामध्ये कृषी विभागाच्या कथित पथकाने धाडी टाकल्या होत्या. या पथकात अधिकार नसलेल्या अनेक खाजगी व्यक्तींचाही समावेश असल्याची माहीती समोर आली आहे. अकोल्यातील एमआयडीसीमध्ये या कृषी विभागाच्या कथित पथकाने धाडी टाकल्या होत्या. या पथकामध्ये कृषीमंत्री अब्दूल सत्तारांचा स्विय सहायक(P.A) दिपक गवळींचा देखील समावेश असल्याचं उघड झालं आहे. (Latest Marathi News)

अशातच या पथकाने पैशाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका खत कंपनीच्या व्यवस्थापकाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे.(Latest Marathi News)

Abdul Sattar
Maharashtra Politics: शिंदे गटातील पाच मंत्र्यांवर टांगती तलवार; गच्छंतीसाठी भाजपचा दबाव?

अकोलामध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावावर कृषी विभागाच्या कथित पथकाने एमआयडीसीमध्ये काल धाडी टाकल्या. मात्र, या पथकामध्ये अधिकार नसलेल्या व्यक्तींचाही समावेश असल्याची बाब समोर आली. तर कृषीमंत्र्यांच्या कथित पथकाविरोधात खंडणीची तक्रार करणाऱ्या अक्षत फर्टीलायझर्स विरोधात कृषी विभागाने कारवाई सुरू केलीय. नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथील कंपनीतील उत्पादनांची विक्री थांबवली असुन या कंपनीचा माल असलेल्या गोदामाला सील लावल्याची माहिती आहे.

Abdul Sattar
Ashadhi Wari 2023: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! परभणीतून पंढरपूरला जाण्यासाठी १३३ बसगाड्या सोडण्याचा निर्णय

तर या संपुर्ण प्रकरणावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी बोलताना म्हंटलं कि, धाडीत काहीच चुकीचं झालं नाही. मतदारसंघातील माझे सहकारी मला सांगूनच हजर असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे. अकोल्यातून तक्रारी आल्यामुळे कारवाई केल्याचे सत्तारांनी सांगितलं आहे. या पआकरणात आता अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर दिपक गवळी यांच्यावरूनही प्रकरण तापण्याची शक्यता आहे. यासंबधीचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.(Latest Marathi News)

Abdul Sattar
Sharad Pawar Threat Case: शरद पवार धमकी प्रकरणी एकाला अटक; आरोपीला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.