Delhi Shraddha Murder Case : दिल्लीतील रक्तरंजित लव्हस्टोरीनं (Shraddha Murder Case) संपूर्ण देशाला हादरून सोडलं आहे. प्रथम प्रेम नंतर संशय, विश्वासघात आणि निर्घृण हत्या. हा क्रम पाहून दिल्ली पोलिसांसह (Delhi Police) सगळेच चक्रावून गेले आहेत. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.
आता पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली आहे. क्रूरकर्मा आरोपी आफताब अमीन पूनावाला (Aftab Amin Poonawala) यानं (Aftab) वसईची (मुंबई) श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हिची गळा आवळून हत्या केली. नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी नियोजनबद्ध कट रचला. आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहासोबत घृणास्पद कृत्य केलं. मृतदेहाचे 35 तुकडे केले. ते फ्रिजमध्ये ठेवले. नंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकले, हा प्रकार अत्यंत वेदनादायी आहे. कोर्टानं आरोपी आफताब याला पोलिस कोठडी सुनावलीय. तर, दुसरीकडं श्रद्धाच्या वडिलांनी आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केलीय.
माध्यमांशी बोलताना श्रद्धाचे वडील विकास वालकर म्हणाले, दिल्लीत न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, नीलम गोरे यांनी सहकार्याची भावना व्यक्त केलीय. त्यांचं मी आभार मानतो. आम्ही श्रध्दाची झालेली हत्या कधीच विसरू शकणार नाही. श्रध्दाच्या हत्येमुळं माझी प्रकृती खराब झालीय. आतापर्यंत झालेल्या तपासाबद्दल दिल्ली पोलीस व वसई पोलिसांचं काम संयुक्तपणे व्यवस्थित चाललं आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी वसई पोलिसांच्या काही असकार्याच्या भूमिकेमुळं मला बराच त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल चौकशी व्हावी. कारण, तसं झालं नसतं तर आज माझी मुलगी जिवंत असती किंवा काही पुरावे मिळण्यास मदत झाली असती, असं स्पष्ट मत श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी व्यक्त केलं.
माझ्या मुलीला न्याय मिळण्यासाठी सर्वांचं सहकार्य मिळत असून न्यायव्यवस्थेवर माझ्या संपूर्ण विश्वास आहे. आफताब पूनावालानं माझ्या मुलीची अत्यंत क्रूरतेनं हत्या केली असून त्याला कठोर शिक्षा व्हावी आणि त्याच्या कुटुंबातील आई-वडील व भाऊ यांचीही चौकशी होऊन त्यांना जास्तीत-जास्त शिक्षा झाली पाहिजे, तसंच या कटात इतर कोणी सामील असतील तर त्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.