ठाण्यात एकनाथ शिंदेच्या समर्थनार्थ सुपुत्र उतरले रस्त्यावर, केलं शक्तिप्रदर्शन

Shrikant Shinde said, the grief of the MLAs was understood from the Shiv Sampark Abhiyan
Shrikant Shinde said, the grief of the MLAs was understood from the Shiv Sampark AbhiyanShrikant Shinde said, the grief of the MLAs was understood from the Shiv Sampark Abhiyan
Updated on

ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना ‘शिवसंपर्क अभियाना’साठी पाठवले होते. त्यावेळी आमदार दिलेल्या ठिकाणी गेले. यावेळी शिवसैनिकांनी आपले दुख व्यक्त केले. महाविकास आघाडीच दम घुटत असल्याचे सांगितले. यातून बाहेरून पडले पाहिजे असे सांगितल्याचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी सांगितले. (Shrikant Shinde said, the grief of the MLAs was understood from the Shiv Sampark Abhiyan)

ठाण्यात शनिवारी (ता. २५) एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी समर्थकांनी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. याप्रसंगी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांची हजेरी पाहण्यासारखी होती.

Shrikant Shinde said, the grief of the MLAs was understood from the Shiv Sampark Abhiyan
एकनाथ शिंदे आपल्या ‘त्या’ विधानावरून पलटले; स्पष्टीकरण देत म्हणाले...

मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सत्ता आल्यानंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाठवले होते. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पाठवले होते. यावेळी सामान्य नागरिकांनी नाही तर आमदारांनी तेथील खरी परिस्थितीची माहिती दिली. आम्हाला निधी दिला जात नाही. आमच्या मतदार संघातील भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री करतो, असे आमदारांनी सांगितल्याचे श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) म्हणाले.

आम्हाला निधी मिळाला तर ते थांबवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पालकमंत्री करतात. आम्ही विरोधात आहोत निधी मिळत नाही असे आधी सांगत होतो. मात्र, आता सत्तेत असतानाही निधी मिळत नाही. मग काम कसे करायचे. लोकांना न्याय कसा द्यायचा. काय फायदा अशा सत्तेचा, असेही शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना आम्ही परिस्थितीची माहिती दिली होती

आम्ही शिवसंपर्क अभियानावरून परत आल्यानंतर दिल्लीला बैठक झाली. यावेळी आमच्याकडून सर्व माहिती घेण्यात आली. लेखीही लिहून घेतले. तेव्हा आम्ही सामान्य कार्यकर्त्यांच्या जीव महाविकास आघाडीत घुसमट असल्याचे सांगितले. त्यांच्यासाठी काहीतरी करा त्यांना न्याय मिळवून द्या असेही म्हटले होते. हे आम्ही मुख्यमंत्र्यांना वारंवार सांगत होतो, असे श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) म्हणाले.

Shrikant Shinde said, the grief of the MLAs was understood from the Shiv Sampark Abhiyan
नितीन देशमुखांचा गॉडफादर कोण? त्यांच्या शब्दावरून घेतला ‘यू टर्न’!

ऊस खरेदीतही भेदभाव

साताऱ्यात मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. या साखर कारखाण्यात ऊस विकायला नेला तर तू कोणत्या पक्षाचा असे शेतकऱ्यांना विचारले जाते. शिवसेना (Shiv sena) म्हटले तर सर्वांत शेवटी उसाची खरेदी केली जाते. माल खरेदी केला नाही तर ते शेतकऱ्यांना जाळावा लागतो. अशी परिस्थिती शिवसेनेची झाली आहे, असेही श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.