Accountant General : निष्क्रिय शासकीय कंपन्या बंद करा;महालेखापालांची शिफारस,तोट्यातील कंपन्यांकडे विशेष लक्ष द्या

राज्य शासनाच्या ४१ सार्वजनिक कंपन्यांचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संपूर्णपणे तोट्यात गेलेल्या निष्क्रिय शासकीय कंपन्या बंद कराव्यात किंवा अंशतः तोट्यात असलेल्या कंपन्यांच्या पुनरुज्जीवनासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी शिफारस महालेखापाल यांनी आपल्या मार्च २०२३ रोजीच्या आर्थिक लेखापरीक्षण अहवालात केली आहे.
Accountant General
Accountant Generalsakal
Updated on

मुंबई : राज्य शासनाच्या ४१ सार्वजनिक कंपन्यांचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संपूर्णपणे तोट्यात गेलेल्या निष्क्रिय शासकीय कंपन्या बंद कराव्यात किंवा अंशतः तोट्यात असलेल्या कंपन्यांच्या पुनरुज्जीवनासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी शिफारस महालेखापाल यांनी आपल्या मार्च २०२३ रोजीच्या आर्थिक लेखापरीक्षण अहवालात केली आहे. हा अहवाल आज राज्य विधानसभेत मांडण्यात आला.

राज्य शासनाच्या ४१ कंपन्यांचा एकूण तोटा ५० हजार ९८ कोटी ५५ लाख रुपयांपर्यंत पोचला आहे. त्यापैकी १३ कंपन्या पूर्णपणे निष्क्रिय असल्याने त्याबाबत निर्णय घेण्यात यावा. त्याचबरोबर ३२ सार्वजनिक कंपन्यांचे भागभांडवल हे उणे झाले आहे. त्यामुळे त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न व्हावेत. या कंपन्यांचे वसूल भाग भांडवल सात हजार ५५१ कोटी ८३ लाख रुपयांचे असताना त्यांचा तोटा हा नऊ हजार ८८७ कोटी १९ लाख रुपयांपर्यंत पोचला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा तोटा वाढून तो दोन हजार ९४८ कोटी ११ लाख रुपयांवर पोचला आहे, तर राज्य रस्ते परिवहन विभागाचा तोटा दोन हजार ६१० कोटी ८६ लाख रुपयांवर पोचला आहे. राज्य ऊर्जा विकास महामंडळाचा तोटा एक हजार १३ कोटी ६३ लाख, राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचा तोटा एक हजार सहा कोटी ७४ लाख रुपयांवर पोचला आहे.

महाजेनको कंपनीचा तोटा एक हजार ६४४ कोटी ३४ लाख रुपये, एमएसआरडीसी सी लिंक कंपनीचा तोटा २९७ कोटी ६७ लाख रुपये आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवे लिमिटेडच्या तोटा २६६ कोटी ५५ लाख रुपये तोटा झाला आहे. या कंपन्यांच्या विविध करांचा भरणा केल्यानंतर हा तोटा तीन हजार ६२३ कोटी ४० लाख रुपयांवर पोचला आहे.

मार्च २०२३ मध्ये ११० शासकीय कंपन्या अस्तित्वात आल्या असल्या, तरी त्यापैकी ३९ कार्यरत कंपन्या आणि पाच निष्क्रिय कंपन्यांनी आपले लेखे समितीला सादर केलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नफा तोट्याबद्दल स्पष्ट सांगता येत नसल्याचे लेखापालांनी नमूद केले आहे. २०२२-२३मध्ये ११० शासकीय कंपन्यांपैकी ४७ कंपन्या एक हजार ८३३ कोटी २९ लाख रुपयांचा नफा कमावला आहे. तर ४५ कंपन्यांना तीन हजार ६२३ कोटी ४० लाख रुपयांचा तोटा झाला.

पुनरुज्जीवनाच्या आराखड्याचा पर्याय

निष्क्रिय कंपन्यांच्या योग्य तो निर्णय घेऊन एकतर त्यांच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार करावा किंवा त्या कंपन्या पूर्णपणे बंद करून योग्य तो निर्णय घ्यावा. फायद्यात चालणाऱ्या कंपन्यांच्या बाबतीत विचार करताना शासकीय निर्णयाप्रमाणे लाभांश देणे शक्य असल्याबाबत कार्यवाही करण्याची शिफारस लेखापालांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.