सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीचा वाद! ‘DGCA’ला काडादी म्हणाले, पूर्वीच्याच जागेवर ६५ मीटर चिमणीला मिळावी परवानगी; विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी म्हणाले...

मंगळवारी कारखान्याच्या वतीने धर्मराज काडादी यांनी ‘डीजीसीए’कडे (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) केली आहे. मात्र, ५० मीटरपेक्षा जास्त उंचीची चिमणी त्याच ठिकाणी उभारल्यास होटगी रोड विमानतळास पुन्हा अडचणी येऊ शकते, असे विमानतळ विकास प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
siddheshwar sugar factory
siddheshwar sugar factorysolapur sakal
Updated on

सोलापूर : श्री सिद्धेश्वर साखर कारखाना सुरळीत चालण्यासाठी पूर्वीच्याच जागेवर ५० ते ६५ मीटर उंचीची चिमणी उभारणीस परवानगी मिळावी, अशी मागणी मंगळवारी (ता. ९) सहाव्यांदा कारखान्याच्या वतीने धर्मराज काडादी यांनी ‘डीजीसीए’कडे (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) केली आहे. मात्र, ५० मीटरपेक्षा जास्त उंचीची चिमणी त्याच ठिकाणी उभारल्यास होटगी रोड विमानतळास पुन्हा अडचणी येऊ शकते, असे विमानतळ विकास प्राधिकरणाने ‘डीजीसीए’समोर स्पष्ट केले आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) आज (मंगळवारी) सोलापूर विमानतळाचे वरिष्ठ अधिकारी व श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तत्पूर्वी, चार-पाच वेळा यासंदर्भात ‘डीजीसीए’कडे बैठका पार पडल्या असून काही दिवसांत अंतिम निर्णय अपेक्षित आहे. तूर्तास ‘आमचा कारखाना सुरळीत चालू राहावा, यासाठी पूर्वीच्या चिमणीच्या जागेवरच ५० ते ६५ मीटरपर्यंत चिमणी उभारायला परवानगी द्या’ असे म्हणणे कारखान्याच्या वतीने श्री. काडादी यांनी दिले आहे.

५० मीटरपेक्षा कमी उंचीची चिमणी कारखान्यासाठी कोणत्याही फायद्याची नाही, असेही कारखाना प्रशासनाकडून ‘डीजीसीए’ला सांगण्यात आले. त्यामुळे ‘तुमच्या नियमात बसेल एवढ्या उंचीची चिमणी उभारू, पण किमान ५० ते ५५ मीटरपेक्षा कमी नकोच’ अशी भूमिका श्री सिद्धेश्वर कारखाना प्रशासकांनी घेतली आहे. त्यावर ‘डीजीसीए’ निर्णय घेणार आहे.

‘डीजीसीए’कडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा

शेतकऱ्यांचा कारखाना सुरळीत चालावा म्हणून चिमणी पाडू नये, यासाठी खूप प्रयत्न केले. पण, अडथळ्यांचा सर्व्हे चुकलेला असतानाही नगरविकास विभागाचा नियम पुढे करून चिमणी जमीनदोस्त करण्यात आली. आता कमी उंचीची चिमणी उभारायला परवानगी मागत आहोत, पण त्यावर निर्णय झालेला नाही. आतापर्यंत सहावेळा ‘डीजीसीए’च्या अधिकाऱ्यांशी बैठका झाल्या आहेत. पुढच्या काही दिवसांत सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे.

- धर्मराज काडादी, माजी अध्यक्ष, श्री सिद्धेश्वर साखर कारखाना

विमानाच्या ‘रन-वे’ला कोणताही अडथळा नको

होटगी रोडवरून काही महिन्यांमध्ये विमानसेवा सुरू होवू शकते. त्यादृष्टीने वॉल कंपाउंड, धावपट्टीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. अशावेळी कारखान्याला पुन्हा त्याच जागेवर ५० मीटरपेक्षा जास्त उंचीची चिमणी उभारता येणार नाही. त्यामुळे विमानाचे टेकऑफ व लॅडिंगला अडचणी येवू शकतात, असे सोलापूर विमानतळाच्या वरिष्ठांनी ‘डीजीसीए’ला सांगितले आहे. त्यामुळे आता ‘डीजीसीए’कडून काय निर्णय घेतला जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()