ओरोस : कणकवली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर (Sindhudurg District Bank Election)भाजपने (BJP) 11 तर आघाडीने (Maha Vikas Aghadi) 8 जागेवर विजय मिळवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल संध्याकाळपासून जल्लोषाला सुरुवात झाली होती. काल शिवसेना (Shivsena) आणि भाजप आमने सामने येत घोषणा दिली होती. सेनेने काल फटाके फोडत जल्लोष साजरा केला. तर आज राणे यांनी गड जिंकल्यामुळे भाजपला फटाके फोडण्याची संधी मिळाली आहे. आत्तापर्यंत महाविकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनलला (Sahakar Samruddhi Panel) आठ जागा तर भाजपला अकरा जागा मिळाल्या आहेत.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या विद्यमान अध्यक्ष उपाध्यक्षांसह दिग्गजांचा पराभव झाला असून, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा प्रतिष्ठेचा गड नारायण राणे (Narayan Rane) यांनी जिंकला. यंदाची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणुकी इतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीपेक्षा वेगळी होती. संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर झालेला हल्ला, नितेश राणे (Nitesh Rane)यांच्यावरील अटकसत्र, राणेंना कोर्टाने बेल नाकारली या सर्व घटनेवरून या निवडणुकीला वेगळे वळण लागले होते.
सिंधुदूर्ग जिल्हा बँक निवडणूकीत १९ जागांपैकी १२ जागांवर भाजपने म्हणजेच नारायण राणे गटाने विजय मिळविला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने 8 जागांवर विजय मिळविला आहे. दरम्यान मविआचे प्रमुख उमेदवार बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचा पराभव झाला आहे. दूसरीकडे नारायण राणे गटाचे प्रमुख उमेदवार राजन तेली यांना महाविकास आघाडीचे उमेदवार सुशांत नाईक यांनी पराभवाचा धक्का दिला आहे. तेलींच्या पराभवामुळे राणे गटास धक्का बसला आहे. यंदाच्या निवडणुकीतील रंगत निकालातून देखील दिसून आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांनी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास निकाल जाहीर केला. यामध्ये भाजपचे विद्यमान संचालक अतुल काळसेकर, गजानन गावडे, महेश सारंग, संदीप परब , समीर सावंत, मनीष दळवी, प्रकाश बोडस, दिलीप रावराणे, प्रज्ञा ढवण, रवींद्र मंडगावकर, विठ्ठल देसाई, विजयी झाले आहेत. तर महा विकास आघाडीकडून विद्यमान संचालक विद्याप्रसाद बांदेकर, व्हिक्टर डान्टस, विद्याधर परब , गजानन देसाई सुशांत नाईक मेघनाथ धुरी , आत्माराम ओडवणेकर आणि निता राणे यांना विजय मिळाला आहे. उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यासाठी काही कालावधी लागणार असून, केंद्रीय मंत्री नारायण राणे काही वेळातच जिल्हा बँकेमध्ये पोचण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून कार्यकर्ते वाट पाहत आहेत. गेल्या तीन तासापासून भाजपच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशा विजय महोत्सव साजरा केला आहे. या पराभवामुळे मात्र महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख सतीश सावंत यांनी अद्यापही माध्यमांशी संवाद साधला नाही. सर्व विजयी आणि पराभूत संचालक अजूनही मतदान पक्षांमध्ये आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.