बँक निवडणूक अन् नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावर येणार निकाल..

निकाल काय लागेल याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.
Narayan Rane
Narayan Ranesakal media
Updated on

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या (Sindhudurg District Central Co operative Bank Election) रणधुमाळीत शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलयं. १८ डिसेंबर रोजी कणकवलीत नरडवे फाट्यावर शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab)यांच्यावर हल्ला झाला होता. हल्ला करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी त्याच दिवशी अटक केली होती. त्यानंतर आणखी दोन व्यक्तींना अटक केली होती. यातील एका आरोपीला पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले होते. ती व्यक्ती सचिन सातपुते (Sachin Satpute)असून, नितेश राणे(Nitesh Rane)यांचे कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट झाले होते. या हल्लामागे भाजप आमदार नितेश राणे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत (Sandesh Sawant) यांचा हात असल्याचा आरोप फिर्यादीत परब यांनी केला. त्यानुसार राणे व सावंत यांना चौकशीची नोटीस पोलिसांनी बजावली.

दरम्यान, राणे यांची अटकेची शक्यता वाढल्याने त्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. त्यांच्यावतीने अॅड रावराणे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. आज अटकपूर्व जामिनाचा निकाल आहे. त्यामुळं नेमकेपणानं काय होणार निकाल काय लागेल याची उत्सुकता कार्यकर्त्याना लागली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सध्या जिल्ह्यात ठाण मांडून आहेत. आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर अंतरिम निर्णय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आणि जिल्हा बँक निवडणूक विषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे सायंकाळी पाच वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. राणे काय बोलणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्यामुळे यंदाच्या बॅंक निवडणुकीचा इतिहास बदलला आहे असं म्हणाव लागेल.

जिल्हा बँक निवडणुकीचे केंद्र असलेल्या कणकवली मतदार संघाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. बँकेसाठी १९ उमेदवार निवडून देण्यासाठी प्रत्येकाला सहा मताचा अधिकार आहे. कणकवली शेती संस्था मतदारसंघातून विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत हे उमेदवारी लढवत आहेत. दोन वेळा बिनविरोध आलेल्या सावंत यांना या खेपेस भाजप (BJP)पुरस्कृत पॅनेलने मोठी टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, सतीश सावंत यांच्या विरोधात खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष विठ्ठल देसाई हे रिंगणात आहेत. या मतदारसंघात ३६ मतदार असून सतीश सावंत यांच्याकडे २२ मतांची बेगमी असल्याचे सांगितले जात आहे. या मतदारसंघात विजयी होण्यासाठी १९ मतांची गरज आहे.

आज सकाळीच जिल्हा बँक निवडणुकीत कणकवली जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत (Satisha Savant)मतदान केंद्राच्या आत मोबाईलवर रिंग वाजली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत (Ranjana Savant)या संतप्त झाल्या. यांच्यात मतदान केंद्रावर शाब्दिक बाचाबाची झाली. पोलिसांनी हा वाद मात्र तातडीने मिटवला आहे. सहकार विभागाने आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांना मतदानाचा हक्क बजावण्यास नाकारला. त्यानंतर जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवार मनीष दळवी (Manish Dalvi) यांचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे भाजपला (BJP) एकामागे एक असे धक्के बसत आहेत. नेमका निकाल काय लागणार, कोणाची हार कोणाची जित होणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.