Sindhudurg Fort : शिवाजी महाराजांनी आजच्याच दिवशी रोवला होता सिंधुदूर्गाचा पाया

छत्रपतींनी गाजवलेल्या इतिहासाची साक्षच जणू हे गडकिल्ले आपल्याला देत आहेत.
Sindhudurg Fort
Sindhudurg Fortesakal
Updated on

Sindhudurg fort history and unknown facts : मराठी माणसाच्या अस्मितेसाठी स्वराज्य उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची किर्ती अथांग आहे. लोकांच्या रक्षणासाठी त्यांनी १६ व्या शतकात बांधलेले किल्ले आजही ताठ मानेने उभे आहेत. छत्रपतींनी गाजवलेल्या इतिहासाची साक्षच जणू हे गडकिल्ले आपल्याला देत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला होय. महाराजांकडे ३६२ किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश-वऱ्हाड या देशापर्यंतचा विस्तार होता. महाराष्ट्रात विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, जंजिरा आणि खांदेरी असे एकूण चार जलदूर्ग आहेत.

त्यातील सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. भारत सरकारने या किल्ल्याला २०१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. याच किल्ल्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.

Sindhudurg Fort
Sindhudurg Fort esakal

समुद्रात किल्ला बांधण्याचा घाट कशासाठी

शिवाजी महाराजांनी सागरी मार्गाने होणाऱ्या हल्ल्याची कुणकुण लागली होती. त्यामूळे जमिनीवरून चाल करून येणारा शत्रू एक दिवस सागरी मार्गे किनारपट्टीवरही पोहोचू शकतो, असा विचार करून हा किल्ला बांधण्याचे ठरवले. समुद्रात किल्ला असल्याने शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच शत्रूला परतवण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती करणे आवश्यक होते. म्हणूनच या किल्ल्याची पायाभरणी झाली.

हिरोजी इंदुलकर होते इंजिनीअर

सन १६६४ मध्ये शिवाजी राजांनी हिरोजी इंदुलकर यांना किल्ला बांधण्याची आज्ञा दिली होती. महाराजांनी या किल्ल्याचे बांधकाम करण्यासाठी मालवण जवळील कुरटे ठिकाणी काळाकभिन्न खडक असलेले बेट निवडले. शिवाजींच्या हस्ते किल्ल्याच्या तटाची पायाभरणी झाली. या किल्ल्याच्या तटबंदीची लांबी तीन किमी असून बुरुजांची संख्या बावन्न आहे. हा किल्ला एकूण ४८ एकर क्षेत्रावर पसरलेला आहे.

Sindhudurg Fort
Sindhudurg Fort esakal

सिंधुदुर्ग हेच नाव का

या किल्ल्याला खास नाव देण्यामागेही एक अर्थ दडला आहे. सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे किल्ला. म्हणून याचे नाव सिंधुदुर्ग ठेवण्यात आले. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहिरी आहेत यांची नावे दूध विहीर, साखर विहीर आणि दही विहीर अशी आहेत.

किल्ला पूर्ण व्हायला किती काळ लागला

हिरोजी इंदुलकरांनी मराठी 3000 मावळे आणि 300 पोर्तुगीज कारागीर या कामासाठी वापरले. त्यामुळे हा किल्ला तीन वर्षात म्हणजे 1667 मध्ये पूर्ण झाला. सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घालण्यासाठी 70000 किलोपेक्षा जास्त लोखंड आणि शिसे वापरण्यात आले आहे.

किल्ला बांधायला किती खर्च आला

सिंधुदुर्ग किल्ल्याची भिंत 29 फूट उंच आणि 12 फूट रुंदीची ची भिंत 2 मैलावर पसरलेली आहे. किल्ल्यावर सुमारे 52 बुरूज आहेत. असा हा अभेद्य किल्ला उभा करण्यासाठी 1 कोटी होन इतका खर्च आला असल्याची नोंद इतिहासात आहे. पश्चिम आणि दक्षिण तटाच्या पाय बांधण्यासाठी 500 खंडी शिसे लागले होते. व यासाठी खर्च 80 हजार होन इतका आला होता.

का आहे खास सिंधुदुर्ग

महाराजांनी बांधलेल्या इतर किल्ल्यांपेक्षा या किल्ल्याला विशेष महत्त्व आहे. ते म्हणजे, या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे आणि हाताचे ठसे उमटवण्यात आले आहेत. ते आजही आपल्याला पाहायला मिळतात. तसेच, येथे शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. या मंदिरात महाराजांची बसलेली मूर्ती आहे.

गोड्या पाण्याच्या विहीरी

किल्ल्याच्या चारही बाजूने खारा समुद्र आहे. आणि किल्ल्यावर गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. ही आश्चर्याचीच गोष्ट म्हणावी लागेल. या विहिरींना दही, दुध, आणि साखर विहीर अशी नावे देण्यात आली आहेत.

देवतांची मंदिरे

सिंधुदुर्ग किल्ल्यावर आपल्याला इतर छोटी मोठी मंदिरे पाहायला मिळतात ती म्हणजे मारूती, महादेव, भगवती देवी या देवांची मंदिरे या किल्ल्यावर आहेत.

उंबराच्या लाकडापासून बनवले प्रवेशद्वार

उंबराचे लाकूड हे दीर्घकाळ टिकते त्यामूळे सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रवेशद्वार उंबराच्या लाकडापासून बनवलेले आहे. केवळ उंबर नाही त सागाच्या लाकडाचाही वापर करण्यात आला आहे.

किल्ल्याजवळील इतर ठिकाणे

तारकर्ली बीच :

तारकर्ली बीच हा किल्ल्यापासून १० किलो मीटर लांब आहे. हा कोकणातील एक सर्वात सुंदर बीच म्हणून ओळखला जातो. याठिकाणी वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद लुटता येतो.

मालवण जिल्ह्यात अनेक पाहण्यासारखे सुंदर बीच आहेत. त्यामध्ये तलाशील टोंडावली बीच , निवती बीच आणि देवबाग बीच इथेही किल्ला पाहून झाल्यावर जाता येते.

कराली बॅकवॉटर्स :

कराली बॅकवॉटर्स हे ठिकाण किल्ल्यापासून २.२ किलो मीटर आहे. कराली बॅकवॉटर्स या ठिकाणी आपण बोट चालवण्याचा आनंद घेवू शकतो. या ठिकाणी कराली नदी अरबी समुद्राला येवून मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.