मुख्यमंत्री, शरद पवारांसह अनेकांनी सिंधूताईंना वाहिली श्रद्धांजली

मुख्यमंत्री, शरद पवारांसह अनेकांनी सिंधूताईंना वाहिली श्रद्धांजली
Updated on

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांचं निधन झालंय. सिंधूताईंना 2021 साली पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.

मुख्यमंत्री, शरद पवारांसह अनेकांनी सिंधूताईंना वाहिली श्रद्धांजली
डोळ्यांच्या कडा ओलावणारी कवयित्री; सिंधूताईंचे वात्सल्यमयी फोटो

'सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. सिंधुताईंनी निराधारांना आधार दिला. त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांना उभे केले. विशेषत: मुलींचे शिक्षण आणि त्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठीचे त्यांचे योगदान महाराष्ट्र विसरू शकणार नाही अशी श्रद्धाजंली मुख्यमंत्र्यांनी वाहिली आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटलंय की, ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. अनाथ मुलांसाठी मायेची सावली धरणाऱ्या सिंधूताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...

मुख्यमंत्री, शरद पवारांसह अनेकांनी सिंधूताईंना वाहिली श्रद्धांजली
Sindhutai Sapkal Passes Away: अनाथांच्या माय सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलंय की, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त दुखःद आहे. स्वतःसाठी जीवन जगण्यापेक्षा इतरांसाठी जीवन व्यतीत करणे खूप कमी जणांना शक्य होते, त्यापैकी एक सिंधुताई सपकाळ होत्या. सिंधुताईंसारखी व्यक्ती महाराष्ट्राच्या भूमीत जन्मली हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे.

सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की, अनाथांची माय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले.अनाथ मुलांना आधार देत त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी म्हटलंय की, 'बाळ धनंजय, माईने समाजाला खूप दिलं, पण माईच्या संस्थेला सरकार म्हणून काहीतरी देणारा तूच रे पहिला...असं म्हणून माझ्या कार्याला अभिनव पोहोच पावती देणारी अनाथांची माय, पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त व्यथित करणारे आहे. निस्वार्थ समाजसेवा या शब्दाचा समानार्थी शब्द माई!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय की, ज्येष्ठ समाजसेविका व 'अनाथांची माय' अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी समजली. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधूताई यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला.

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलंय की, सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. स्वतःच्या जीवनात अतिशय विपरीत परिस्थिती येऊन देखील सिंधुताईंनी स्वतःला सावरले व पुढे त्या हजारो अनाथ मुला - मुलींच्या आई होऊन त्यांचे जीवन सावरले.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय की, अनाथांच्या नाथ,उपेक्षितांना मायेची ऊब देणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री माई सिंधुताई यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मन सुन्न झाले. त्यांच्यावर प्रेम करणारा अवघा महाराष्ट्र आज पोरका झाला. दुःखाचा डोंगर पेलून तुम्ही माया, प्रेम अबाधित ठेवलं. माई,तुम्ही महानच ! भावपूर्ण आदरांजली!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.