पद्मश्री ते अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार वाचा सिंधुताईंचा प्रवास

सिंधुताई या मुळातच बुद्धिमान होत्या असे असले तरी, त्यांना जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आले.
Sindhutai Sapkal
Sindhutai Sapkal
Updated on

पुणे : अनाथांसाठी सेवाकार्य (Social Worker Sindhutai Sapkal) करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने पुण्यातील रूग्णालयात निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. सिंधूताई सपकाळ यांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक पुरस्कार देण्यात आले आहेत. (Sindhutai Sapkal Died In Pune)

Sindhutai Sapkal
स्मशानात चितेवर भाजलेली भाकरी ते पद्मश्री; सिंधूताईंचा प्रवास थक्क करणारा

सिंधूताईंचा जन्म

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal Birth Place ) यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. सिंधूताईंचा जन्म ज्यावेळी झाला त्यावेळी मुलगी नको असताना मुलगी झाल्याने म्हणून त्यांचे नाव चिंधी ठेवण्यात आले होते. सिंधूताई या मुळातच बुद्धिमान होत्या असे असले तरी, त्यांना जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आले. (sindhutai Work )

Sindhutai Sapkal
सिंधुताई सपकाळ : मुलगी नको असल्याने आई-वडिलांनी ठेवले होते चिंदी नाव

सिंधुताईंचे वडील अभिमान साठे गुरे वळायचे काम करायचे. दरम्यान, त्यांचे गाव लहान असल्याने तेथे सुविधांचा अभाव असल्याकारणाने त्यांचे वडील घरची गुरे राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे त्यावेळी सिंधूताई शाळेत जाऊन बसायच्या. सिंधूताईंचा विवाह वयाच्या 9 व्या वर्षी झाला होता. अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणे झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला.

ममता बाल सदनाची स्थापना

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या ठिकाणी केली. त्यांनी स्वतःची मुलगी ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले. त्यानंतर त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. सिंधुताईंनी सुरु केलेल्या बाल सदनात लहान मुलांना सर्व शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या भोजन, कपड्यांसह इतर सुविधांदेखील संस्थेकडून पुरविल्या जातात. या ठिकाणी मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे यादृष्टिकोनातून त्यांना मार्गदर्शन देण्याचे कामदेखील केले जाते. याशिवाय आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते.

सिंधूताई सपकाळ यांना मिळालेले पुरस्कार

सिंधुताईं सपकाळ यांनी सुमारे 750 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये 2021 मध्ये पद्मश्री पुरस्कार, 2012 मध्ये महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, 2012 मध्ये पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा 'कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार', 2010 मध्ये महाराष्ट्र शासनाचा 'अहिल्याबाई होळकर पुरस्कार', मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (2013),आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (1996), सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार, राजाई पुरस्कार, शिवलीला महिला गौरव पुरस्कार, श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा 'सामाजिक सहयोगी पुरस्कार' (1992), सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला 'रिअल हीरो पुरस्कार' (2012), 2008 - दैनिक लोकसत्ताचा 'सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार', प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (2015), डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (2017), पुणे विद्यापीठाचा 'जीवन गौरव पुरस्कार' यासह अनेक पुरस्कराने सिंधुताईंना गौरविण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()