Devendra Fadanvis: त्र्यंबकेश्वर मंदिरातील घटनेची फडणवीसांकडून गंभीर दखल; SIT करणार चौकशी

उरुस दरम्यान इतर धर्मियांकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
Devendra Fadanvis
Devendra FadanvisEsakal
Updated on

त्र्यंबकेश्वरमध्ये उरुस दरम्यान इतर धर्मियांकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल घडली. मंदिर प्रशासनाने वाद घालणाऱ्या जमावाला रोखलं. पोलिसांच्या आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला. मात्र जमावावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पत्र पोलिसांना देण्यात आले आहे.

तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची ब्राम्हण महासंघाची मागणी केली. राज्यातील अनेक भागांत तणावाची परिस्थिती असताना त्र्यंबकेश्वरमध्ये देखील घडला धक्कादायक प्रकार आहे. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ब्राह्मण महासंघाने दिला होता. आता या प्रकरणाची चौकशी एसआयटी करणार आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या कथित घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Devendra Fadanvis
PM Modi Rojgar Mela 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७१ हजार तरुणांना देणार ऑफर लेटर

या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्या वर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती.

Devendra Fadanvis
Solapur Dance Bar : डान्स बार बहाद्दर भूमिहीन; बारबाला मात्र थ्री- थ्री बीएचके लक्झरी फ्लॅटच्या मालकीण!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.