बदल्यांसाठी देशमुख अनधिकृत यादी द्यायचे, मंत्रालयातील मोठ्या अधिकाऱ्याचा दावा

याप्रकरणी ईडीने नुकत्याच या वसूलीप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
ed
edesakal
Updated on
Summary

याप्रकरणी ईडीने नुकत्याच या वसूलीप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (sitaram kunte) यांना ईडीनं समन्स (enforcement directorate summons) बजावल्यानंतर ईडी कार्यालयात त्यांची चौकशाही (investigation in ED office) करण्यात आली होती.

दरम्यान आता अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत यादी पाठवायचे असा जबाब सिताराम कुंटे यांनी ईडीकडे नोंदवला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढू होऊ शकते. अनिल देशमुखानी पोलिसांच्या पोस्टिंगची यादी अतिरिक्त सचिव सिताराम कुंटे यांच्याकडे दिली होती. याप्रकरणी ईडीने नुकत्याच या वसूलीप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

ed
पुण्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरू, अजित पवारांकडून नवी नियमावली जाहीर

ईडीच्या चौकशीत कुंटेंनी दिलेली माहिती अशी, अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे बहुतांश निर्णय हे देशमुखच घेत होते. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधून ४० कोटी रुपये घेतल्याचे अटकेतील आरोपी सचिन वाझे यांनी ईडी समोर कबूल केले आहे. तसेच हे पैसे देशमुख याचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि परब यांचे बजरंग खरमाटे (सह आयुक्त आरटीओ) यांना दिल्याचे वाझे यांनी चौकशीत सांगितले आहे.

दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या 100 कोटीच्या घोटाळ्यात ईडीला काही चौकशी करायची असल्याने सीताराम कुंटे यांना बोलावण्यात आलं होतं. यावेळी याप्रकरणाची चौकशीही झाली होती. अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना सीतीराम कुंटे गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर कार्यरत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()