Salim Kutta: "इक्बाल मिर्चीशी कनेक्शन असलेले सोबत बसलेत"; सलिम कुत्ताच्या प्रकरणावरुन काँग्रेसचा भाजपला टोला

भाजपनं यावरुन ठाकरे गटाला टार्गेट केलं आहे.
Nana patole-devendra fadnavis
Nana patole-devendra fadnavisSakal
Updated on

मुंबई : ठाकरे गटाचे नाशिकचे शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा गँगस्टर सलिम कुत्ताशी संबंधावरुन सध्या राज्याच्या राजकारणाला आरोप-प्रत्यारोपांसाठी नवा विषय मिळाला आहे. भाजपनं यावरुन ठाकरे गटाला टार्गेट केलं आहे. पण भाजपला यावरुन बोलायचा अधिकार नाही, असा आरोप करत काँग्रेसनं टोला लगावला आहे. (Sitting with Iqbal Mirchi connection Congress taunts BJP over Salim Kutta matter)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलो म्हणाले, "दाऊद आपल्या देशाचा वॉन्टेड असून एक दहशतवादी आहे. त्याच्यासोबत जे कोणी लोक आहेत ते देखील देशद्रोही आहेत. त्यामुळं एक सलिम कुत्ताचा फोटो दाखवून भाजप ज्या प्रकारची मागणी करत आहेत त्याचा त्यांना अधिकार आहे का? (Marathi Tajya Batmya)

Nana patole-devendra fadnavis
Lalit Patil: "फडणवीस शांतपणे अत्यंत खोट बोलत आहेत"; ललित पाटील प्रकरणावरुन अंधारेंचा आरोप

इक्बाल मिर्चीसोबत ज्या लोकांचं कनेक्शन आहे, पार्टनरशीप आहे, ते यांच्यासोबत बसू शकतात त्यामुळं एकासाठी एक आणि दुसऱ्यासाठी दुसरा न्याय असं होऊ शकत नाही. त्यामुळं भाजपनं आधी आपल्या स्वतःमध्ये झाकून पाहिलं पाहिजे त्यानंतर इतरांवर कारवाईची मागणी करायला पाहिजे, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Nana patole-devendra fadnavis
Salim Kutta: ठाकरे गटाच्या नेत्यासोबत दिसलेला गँगस्टर सलिम कुत्ता कोण? त्याला 'कुत्ता' ही ओळख कशी पडली?

सलिम कुत्ताचं प्रकरण काय?

मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला सलीम कुत्ता हा गँगस्टर सध्या चर्चेत आला आहे. कारण शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नाशिकचे शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा एक पार्टीतला व्हिडिओ समोर आला आहे.

यामध्ये बडगुजर हे सलीम कुत्ता सोबत डान्स करताना दिसत आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत या दोघांचा फोटो दाखवल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.