ओमिक्रॉनची धास्ती! पुण्यातील शाळा 30 जानेवारीपर्यंत राहणार बंद

महाविद्यालये सुरू ठेवण्याबाबत उद्या दुपारी 4 वाजता निर्णय घेतला जाणार आहे.
school
schoolsakal
Updated on

पुणे : वाढत्या ओमिक्रॉनच्या (Omiccron) रूग्णसंख्येमुळे (School Closed In Pune City ) पुणे शहरातील पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आढावा बैठक पार पडली. यामध्ये पहिली ते नववी पर्यंतचे वर्ग पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही याबाबतचा निर्णय उद्या दुपारी 4 वाजता घेतला जाणार आहे. (Pune City School Closed Till 30th Jan 2022)

school
ओमिक्रॉननंतर आता 'IHU' ची एन्ट्री; फ्रान्समध्ये आढळला नवा व्हेरियंट

मुंबईतील नववीपर्यंतच्या शाळा पुन्हा बंद

कोरोनाचा कहर आता पुन्हा एकदा वाढतो आहे. ओमिक्रॉन (Omicron) व्हेरियंटचा धोका वाढला असून त्या पार्श्वभूमीवर मुंबईसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) प्रमुख आयएस चहल यांनी सांगितलंय की, कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील इयत्ता 1 ते 9 पर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद राहतील. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इ.10 वी व 12 वी चे वर्ग वगळता अन्य वर्ग असणा-या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा प्रत्यक्ष अध्यापनासाळी बंद ठेऊन ऑनलाईन पध्दतीने सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

school
राज्याचं कोरोनाबाबतचं काम संथगतीनं; गती वाढवावी: केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार

पूर्ण लसीकरण झालेल्या 80 टक्के पुणेकरांना संसर्ग

पुण्यामध्ये करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस (Covid 19 Vaccination) घेतलेले 80 टक्के लोक करोनाबाधित आढळत आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी (Pune Mayor Murlidhar Mohol On Covid Cases ) दिली आहे. दरम्यान, वाढत्या रूग्णसंख्येमुळे चिंता करण्याचे कारण जरी नसले तरी, आधीच्या निर्बंधांची (Covid Restrictions In Pune ) अधिक सक्तीने अंमलबाजवणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच पुण्यातील रूग्णसंख्या एका आठवड्यात चौपट झाल्याचेदेखील यावेळी स्पष्ट केले.

मोहोळ म्हणाले की, आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये तीव्र स्वरूपाची लक्षणे (No Major Symptoms In Omicron Patient ) दिसून येत नसून ओमिक्रोनच्या रुग्णांमध्येदेखील अगदी सौम्य लक्षणे दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुण्यातील 3 लाख (Corona Vaccination In Pune) लोकांनी 84 दिवस उलटूनही दुसरा डोस घेतला नसून अशा नागरिकांपर्यंत महापालिका पोहोचणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मास्क तसेच नियमांच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथके तयार करण्यात येणार असून 10 जानेवारी पासून फ्रंट लाईन वर्कर, 60 वर्षांवरील नागरिक, सहव्याधी असलेल्या रुग्णांना बूस्टर डोस दिला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गरज भासल्यास कोविड सेंटर सुरू करणार

शहरातील कोविड सेंटरबाबत (Covid Center In Pune) बोलताने ते म्हणाले की, वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, गरज भासल्यास कोविड केअर सेंटर सात दिवसांच्या नोटिसवरदेखील ते चालू केले जाऊ शकते. वाढत्या रूग्णसंख्येमुळे नागरिकांनी चिंता करण्याची गरज नसून यापूर्वीच्या निर्बंधांची अधिक सक्तीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आल्याचे मोहोळ यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.