Raj Thackeray: "सत्तेचा साबण खूप वेगळा असतो"; अमोल कोल्हेंच्या 'त्या' प्रश्नावर राज ठाकरेंचं सडेतोड उत्तर

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज ठाकरेंना प्रश्न विचारला होता.
Amol Kolhe_Raj Thackeray
Amol Kolhe_Raj Thackeray
Updated on

मुंबई : भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नेते मंडळी सत्ताधारी पक्षात गेल्यानंतर आरोपमुक्त होतात, या चर्चांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेमक्या शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यातील मुलाखतीत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारला होता. (Soap of power is very different Raj Thackeray answer to Amol Kolhe political question)

Amol Kolhe_Raj Thackeray
Raj Thackeray: उपमुख्यमंत्री कोणासोबत आहेत तेच कळत नाही! अमृता फडणवीसांच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा टोला

तपास यंत्रणांचा उपयोग विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी होतो का? नाल्याचा प्रवाह सत्तेच्या दिशेनं वळला की न्यायानं सरसकट साफाई व्हायला पाहिजे पण तसं होतं नाही. याबद्दल राज ठाकरेंची भूमिका काय? असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी राज ठाकरेंना विचारला. यावर "सत्तेचा साबण खूप वेगळा असतो" असं नेमकं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं.

Amol Kolhe_Raj Thackeray
Sanjay Raut Vs Rahul Kul: "तुम्ही मिस्टर कुल आहात तर मी मिस्टर हॉट, सोडणार नाही"; राऊतांचा राहुल कुल यांना इशारा

राज पुढे म्हणाले, "अनेक ठिकाणी तपास यंत्रणा चुकीच्या पद्धतीनं राबवल्या जातात. पण बऱ्याचदा बरोबरही असतात. अनेक ठिकाणी जे तुंबलेले नाले आहेत ते साफ केलेच पाहिजेत. कोणीतरी एखादी गोष्ट करतं त्यानंतर दुसरे सत्तेत आल्यानंतर ते दामदुपट्टीनं करतात. काँग्रेसच्या काळात रतन टाटांना चौकशीसाठी बोलावलं जातं मग सत्ता बदल झाल्यानंतर ते उलटं होणारच.

Amol Kolhe_Raj Thackeray
Raj Thackeray : एकनाथ शिंदेंनी जपून राहावं, राज ठाकरे असं का म्हणाले?

सत्तेचा साबण खूप वेगळा असतो, काय होतं थोडसं अंगाला काही लागलं की नेते मंडळी सत्तेजवळ जातात आणि स्वतःला घासून पुसून घेतात आणि स्वच्छ होऊन जातात. हे आपण आधीही पाहिलंय आणि नंतरही पाहतोच आहोत. त्यामुळं याबाबत फारसा पार्टी विथ डिफरस्न दिसत नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपला टोलाही लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.