Social Media Addiction: ‘फेसबुक’ आणि ‘इन्स्टाग्राम’मुळे होतोय लहान मुलांच्या मानसिक आरोग्याशी खेळ ; मेटा विरोधात खटला दाखल

Social Media Addiction
Social Media AddictionEsakal
Updated on

Social Media Addiction: समाजमाध्यमांच्या विश्वात ‘फेसबुक’ आणि ‘इन्स्टाग्राम’ या दोन्ही प्लॅटफॉर्मचा मोठा दबदबा पाहायला मिळतो. काही क्षणांमध्ये आभासी जगात घेऊन जाणाऱ्या या दोन्ही प्लॅटफॉर्मवर आता लहान मुलांच्या मानसिक आरोग्याशी खेळल्याचा आरोप होतो आहे. या चिमुकल्यांना होणाऱ्या त्रासातून या कंपन्यांनी फायदा उकळल्याचा आरोप करत या दोन्ही कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्या ‘मेटा’विरोधात अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये खटले भरण्यात आले आहेत.

Social Media Addiction
Social Media Addiction : सोशल मीडियाशिवाय बनवा आयुष्य सुंदर अन् संतुलित

कॅलिफोर्नियातील ऑकडलंड येथील फेडरल न्यायालयात याबाबतचा मुख्य खटला भरण्यात आला आहे. या दोन्ही प्लॅटफॉर्मवर ज्या पद्धतीने लहान मुलांचे भावविश्व हाताळले जाते, त्यावर कायदेशीर नियंत्रण ठेवले जावे अशी आग्रही मागणी विविध घटकांकडून करण्यात आली. अमेरिकेतील जवळपास चाळीस राज्यांनी ‘मेटा’विरोधात खटले भरले आहेत. अनेकांनी फेडरल न्यायालयामध्ये जाण्याऐवजी स्थानिक न्यायालयांमध्येच जाणे पसंत केले आहे.

नेमका ठपका काय?

‘फेसबुक’ व ‘इन्स्टाग्राम’ कंपन्यांची वर्तणूक भ्रामक आणि बेकायदा असून उच्च जोखीम असलेल्या गटातील तरुणाईला आर्थिक फायद्यासाठी इजा पोचविल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अशा प्रकारची कृत्ये थांबविण्यासाठी ‘मेटा’ला म्हणून आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे केली आहे. विविध राज्यांच्या तसेच केंद्रीय कायद्याला हानी पोचविल्याप्रकरणी या दोन्ही कंपन्यांना जबर दंड ठोठावण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

शोषण करणारे बिझनेस मॉडेल

तरुणाईचे शोषण केले जाईल, अशा पद्धतीनेच ‘मेटा’ने स्वतःचे बिझनेस मॉडेल तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आपल्या शरीराला इजा होते आहे हे ठावूक असताना देखील यूजर या प्लॅटफॉर्मवर अधिकाधिक वेळ कसा खर्च करतील? यावर या कंपन्यांनी लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते, असे याचिकाकर्त्यांकडून सांगण्यात आले.

Social Media Addiction
Social Media Influencers : 'आमचं दुखणं अवघड जागेचं, कुणाला बोलता येईना, बॉलीवूडवाले आम्हाला फक्त....'!

...म्हणून चौकशी सुरू

‘मेटा’च्या माजी कर्मचारी फ्रान्सिस हॉगन यांनी २०२१ मध्ये कंपनीशी संबंधित गोपनीय माहिती उघड केली होती. यातून या कंपन्यांची काही उत्पादने ही तरुणाईच्या मानसिक आरोग्याशी कशा पद्धतीने खेळत आहेत यावर त्यात प्रकाश टाकण्यात आला होता. हॉगन यांनी तब्बल वीस हजार कागदपत्रे उघड केली होती त्यामुळे फेसबुकविरोधात चौकशी सुरू झाली होती. अमेरिकी आणि युरोपीय सदस्यांसमोर २०२१ मध्ये बाजू मांडताना फ्रान्सिस यांनी या दोन्ही कंपन्यांना विषारी कंटेंटला आळा घालण्यात अपयश आल्याचा आरोप त्यांनी केला होता त्यामुळे या कंपनीवर विश्वास ठेवता येऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. हा वाद टाळण्यासाठीच फेसबुकने स्वतःचे ‘मेटा’ असे नामकरण केल्याचीही चर्चा आहे.

‘मेटा’चे म्हणणे काय?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली मुले सुरक्षित राहावीत, या उद्देशाने काही तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आम्ही ३० नवे टूल आणल्याचा दावा ‘मेटा’कडून करण्यात आला होता. या खटल्यांवर देखील कंपनीकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. विशिष्ट वयोगटाला अनुसरून मानके निश्चित करण्यात अपयश आल्याबद्दल कंपनीने राज्यांवरच नाराजी व्यक्त केली आहे.

Social Media Addiction
Social Media Addiction : रिल्समधील तुमची ओळख आहे आभासी; व्यसन ठरणार घातक...!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.