सोलापूर - सर्वाधिक केळी उत्पादनाच्या जळगावला मागे टाकून सोलापूर जिल्हा केळी निर्यातीत अव्वल बनला आहे. या पार्श्वभूमीवर आता करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी याठिकाणी केळी संशोधन केंद्र सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
राज्याच्या कृषी विभागाने त्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राहुरी कृषी विद्यापीठाचे फलोत्पादन विभागप्रमुख, शेलगाव वांगीचे प्रक्षेत्र प्रमुख व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवणार आहे.