साताऱ्यात २०१९ च्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर पाऊसात सभेला संबोधीत केले होते. त्यावेळीही पवारांनी प्रकृतीचा विचार न करता, पावसात भाषण केलं. त्याची पुनरावृत्ती सोलापुरमध्ये पाहिला मिळाली पवार पुन्हा एकदा पावसात भिजले.
त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. शरद पवार यांनी शब्द दिला आणि तो पाळला नाही असं कधीच झालं नाही, मग परिस्थिती कोणतीही असो. असंच सोलापुरातील आपल्या सहकाऱ्याच्या दिलेला शब्द पाळला आणि भर पावसात एका लग्नाला हजेरी लावली.
पवार यांचे मित्र सपाटे यांच्या परिवारातील सदस्यांच्या विवाहासाठी शरद पवार हजेरी लावणार होते. विवाहाचा मुहूर्त निघून गेला, अक्षता पडल्या पवार यांची वाट पाहण्यासाठी वऱ्हाडी मंडळी, पवारांचे हितचिंतक लग्नस्थळी थांबले होते.
रात्री साडेनऊच्या सुमारास शरद पवार यांनी हजेरी लावली. मात्र शरद पवार यांच्यापूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. पाऊस येऊ लागल्याने वऱ्हाडी मंडळी आडोशाला गेली होती.
पवारांच्या वाहनांचा ताफा येताच भर पावसात वऱ्हाडी मंडळी मुख्य स्टेजजवळ आली. पावसामध्ये पवारांनी वाहनातून उतरत वधू-वरांना आशीर्वाद दिला. सपाटे परिवाराकडून पवार यांनी पावसातच सन्मान स्वीकारला. ‘राष्ट्रवादी पुन्हा’ या गाण्याच्या तालावर पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.