संभाजी भिडेंच्या फोटोला दुग्धभिषेक करून घोषणाबाजी; समर्थकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

Sambhaji Bhide
Sambhaji Bhide
Updated on

बीड - मागील काही दिवसांपासून संभाजी उर्फ मनोहर भिडे सातत्याने वादग्रस्त विधाने करत आहेत. त्यांच्या विधानांमुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. भिडेंनी महात्मा गांधी, ज्योतिबा फुले, पंडीत जवाहरलाल नेहरू आणि साईबाबा यांच्याविषयी वादग्रस्त विधाने केली होती. याविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्याचवेळी संभाजी भिडेंच्या समर्थनात आंदोलन करण्यात येत आहे.

Sambhaji Bhide
बीड जिल्ह्यात काढली मनोहर भिडे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा; रयत क्रांती संघटना आक्रमक

सोलापूर जिल्ह्यातील छत्रपती संभाजी महाराज चौकात संभाजी भिंडे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात भिडे समर्थक उपस्थित होते. त्यावेळी ठिय्या आंदोलन करणाऱ्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Sambhaji Bhide
Amol Mitkari News: "फडणविसांनी भिडेंना गुरु मानावं, ते त्यांना लखलाभ"; मिटकरी जुन्या आवेशात, भाजपला घरचा आहेर

दोन दिवसांपासून सोशल मीडियावर संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ एकत्र यायचं अशी पोस्ट फिरत होती. त्यात एकत्र येण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आलं होतं. चार वाजता हे आंदोलन होणार होतं. त्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. मात्र काही कार्यकर्त्यांनी पोलिसांना चकमा देत संभाजी महाराज चौकात दुग्धभिषेक केला. तसेच ज्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं, त्यांना सोडवण्यासाठी ठिय्या आंदोलन केलं. यावेळी पोलिसांविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान पोलिसांना गर्दीला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. तसेच काही कार्यकर्ते गल्ल्यांमध्ये लपून बसले आहेत. त्यांनाही ताब्यात घेण्यात येत आहे. पोलिसांनी दुग्धाभिषेक कऱण्यात मज्जाव केला होता. मात्र कार्यकर्त्यांनी तरी देखील दुग्धाभिषेक घातला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()