Solar Project : कारखान्यांच्या रिकाम्या जागेवर सौर प्रकल्प;साखर आयुक्तांकडे कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक

राज्यातील साखर कारखान्यांकडे असलेल्या रिकाम्या जागेवर आता सौरऊर्जा प्रकल्प उभे राहणार आहेत. साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेत त्यांच्याकडे असलेल्या जागेवर सौर प्रकल्प उभारणे कसे फायदेशीर आहे, हे समजावून सांगत संबंधित कारख्यान्यांना वीज प्रकल्प उभारण्याचे आवाहन केले.
Solar Project
Solar Project sakal
Updated on

मुंबई : राज्यातील साखर कारखान्यांकडे असलेल्या रिकाम्या जागेवर आता सौरऊर्जा प्रकल्प उभे राहणार आहेत. साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेत त्यांच्याकडे असलेल्या जागेवर सौर प्रकल्प उभारणे कसे फायदेशीर आहे, हे समजावून सांगत संबंधित कारख्यान्यांना वीज प्रकल्प उभारण्याचे आवाहन केले. त्याला अनेक साखर कारखान्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

राज्यात जवळपास २३० सहकारी आणि खासगी साखर कारखाने आहे. या कारखान्यांकडे जमीन असतानाही त्याचा फारसा उपयोग होत नाही. तसेच सध्या सौरऊर्जा प्रकल्पांनाही पुरेशी जमीन उपलब्ध होत नाही. एक मेगावाॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी किमान पाच एकर जमीन लागते; मात्र ती नसल्याने किंवा जमीन संपादनात अडथळे येत असल्याने साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी साखर कारखान्याच्या आजूबाजूच्या जागेवर सौर पॅनल लावून वीजनिर्मिती करता येईल, असा प्रस्ताव कारखान्यांपुढे ठेवला आहे. सौर प्रकल्प उभारणीचा खर्च प्रतिमेगावाॅटला चार कोटी रुपये आहे. त्यामुळे जमीन असलेले कारखाने स्वत: सौरऊर्जा प्रकल्प उभारू शकतात किंवा ती भाडेपट्ट्यावरही सौर प्रकल्प उभारणाऱ्या कंपन्यांना देऊ शकतात.

उत्पन्नही मिळणार

साखर कारखान्यांच्या परिसरात असलेल्या जागेवर सौर प्रकल्प उभारल्यास संबंधित कारखान्यांना तेथे तयार होणारी वीज वापरता येणार आहे. त्यामुळे सध्या त्यांना येत असलेले लाखो रुपयांचे वीजबिल कमी होऊ शकेल. तसेच वापराशिवाय शिल्लक राहणारी वीज नेट मीटरिंगच्या माध्यमातून ग्रीडमध्ये टाकल्यास त्याचे पैसेही मिळू शकणार असल्याची माहिती ‘महावितरण’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.