Maratha Reservation : संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा, धनगर आरक्षणाचा प्रश्न कायमचा सोडवा; रोहित पवारांची मागणी

Maratha Reservation Rohit Pawar and Narendra Modi
Maratha Reservation Rohit Pawar and Narendra Modi
Updated on

जळगाव - मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळत चालला आहे. त्यातच मराठा आंदोलकांना झालेल्या मारहाणीच्या मुद्दावरून राजकारण तापलं आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून विशेष अधिवेशन बोलविण्यात आलं आहे. या अधिवेशनात मराठा आऱक्षणासह धनगर आरक्षणाचा निपटारा करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Maratha Reservation Rohit Pawar and Narendra Modi
Maharashtra Politics : राज्यात आणखी एक काका-पुतणे भिडणार! ठाकरेंच्या शिवसेनेत आज वाजत-गाजत होणार प्रवेश

मराठा आरक्षणाच्या घटनेवरून मराठा समाज तसेच विविध पक्ष आक्रमक झाले आहेत. जळगावात आमदार रोहित पवार यांनी मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. (Marathi Tajya Batmya)

यावेळी रोहित पवार म्हणाले की, पाच दिवसांचे तातडीचे संसदेचे अधिवेशन होत आहे. मराठा आरक्षणासह धनगर समाजाच आरक्षण आणि इतर समाजाचे विषय हे कायमचे संपवावे यासाठी केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारकडे मी विनंती करणार आहे.

Maratha Reservation Rohit Pawar and Narendra Modi
Mumbai Local Drugs Video : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार! मुलामुलींचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात पाठपुरावा करू तसेच वेळप्रसंगी आरक्षण प्रश्नी संघर्ष करावा लागला तर संघर्ष ही करू असं महत्त्वपूर्ण विधान रोहित पवार यांनी केलं. जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध राज्यभरात नोंदवण्यात येत आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांत बंदची हाक देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.