मंदिरे पुन्हा बंद होतील का? राजेश टोपेंनी दिलं उत्तर

Rajesh Tope on Religious Places
Rajesh Tope on Religious PlacesEsakal
Updated on

मुंबई : सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या (Maharashtra Corona Cases) झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यात काही निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्यात नाईट कर्फ्यू लागण्याची शक्यता (Maharashtra Night Curfew) व्यक्त केली जात आहे. पण, कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून बंद असणारे मंदिर आणि धार्मिक स्थळ आणखी बंद होणार का? याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Minister) यांनी उत्तर दिलं आहे.

Rajesh Tope on Religious Places
Lockdown in Mumbai| मुंबईत लवकरच लॉकडाऊन? पालिका आयुक्तांची माहिती

धार्मिक स्थळांवर निर्बंध? -

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत धार्मिक स्थळ पूर्णपणे बंद होती. पण, नवरात्रीच्या मुहूर्तावर मंदिरे उघडण्यात आली होती. आता पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे धार्मिक स्थळं आणखी बंद होतील का? अशी भीती आहे. त्याबाबत राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं असून सर्वच धार्मिक स्थळांवर गर्दी टाळावी लागेल. सर्वत्र गर्दी टाळण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. आपआपल्या कडक लॉकडाऊन करायचं नाही. पण, गर्दी होऊ नये यासाठी राज्य सरकार आग्रही आहे, असं राजेश टोपे म्हणाले.

मुंबईत नाईट कर्फ्यू? -

मुंबईत रुग्णसंख्या वाढत आहे. अशापरिस्थिती काही अनावश्यक गोष्टींवर निर्बंध लावावे लागतील. महापालिकेच्या वतीने काही कडक निर्बंध लागू शकतात. मुंबईत जीवनावश्यक वस्तू सोडून नाईट कर्फ्यू लावता येईल का? याबाबत सध्या विचार सुरू आहे. रात्रीच्या फिरण्यावर, हॉटेलिंगवर निर्बंध आणणे गरजेचे आहे. गरज असल्यास रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा प्रस्ताव आहे, असे संकेत राजेश टोपे यांनी दिले. ते टीव्ही ९ मराठी सोबत बोलत होते.

लोकल प्रवासावर निर्बंध येतील का? -

मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा निर्बंध येऊन लोकलमध्ये प्रवास करण्यावर बंदी येईल का? याबाबत मुंबईकरांच्या मनात अनेक शंका आहेत. त्यावर देखील राजेश टोपे यांनी भाष्य केलं असून लोकलच्या संदर्भात तसा काही निर्णय नक्कीच नाही. पण, अत्यावश्यक सेवा नसलेल्या काही गोष्टींवर निर्बंध आणता येतील का? याबबात विचार होण्याची शक्यता आहे, असं राजेश टापे म्हणाले.

दुकानं, मॉल रेस्टॉरंटबाबत काय नियम? -

दुकानं, मॉल रेस्टॉरंटबाबत काही नियम येतील का? याबाबत राजेश टोपे म्हणाले, ''जे काही ठरेल ते मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतर ठरणार आहे. याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतला नाही. लगेच निर्बंध इतके कडक करण्यासारखी परिस्थिती नाही. पण, रात्री कर्फ्यू लावण्याबाबत विचार आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.