मुंबई- राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मायक्रो कंटेन्मेंट झोनबाबत (MCZ) एसओपी जाहीर करण्यात आले आहेत. कोणत्याही कोऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीमध्ये पाचपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आल्यास त्याला मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले जाणार आहे. अशावेळी संपूर्ण सोसायटीला सील केले जाईल. एकापेक्षा अधिक सोसायटीमध्ये कोरोना शिरकाव झाल्यास याबाबत मायक्रो कंटेन्मेंट झोन ठरवण्याचा अधिकार डिझास्टर मॅनेटमेंट ऑथोरेटीकडे (DMA) असणार आहे.
-मायक्रो कंटेन्मेंट झोनच्या बाहेर बोर्ड लावण्यात येईल, जो लोकांना जहजपणे दिसावा. MCZ मध्ये प्रवेशाची आणि बाहेर पडण्याचा मार्ग डीएमए निश्चित करेल. मेडिकल आणि इतर अत्यावश्यक सेवा वगळून या परिसरात येण्यास कुणालाही मुफा नसेल.
-मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये बाहेरील व्यक्तीच्या येण्यास पूर्णपणे मज्जाव असेल. शिवाय सोसायटीतील कचऱ्याची विल्हेवाट स्वतंत्रपणे करण्यात यावी.
- सोसायटीने एन्ट्रीच्या ठिकाणी सॅनिटायझर, तापमान मोजण्याचे यंत्र ठेवावे. लिफ्ट वारंवार सॅनिटाईज करावी.
- लक्षणे असलेल्या, तसेच हाय रिस्क असणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी करण्यात यावी
- सोसायटीमध्ये घरीच विलगीरकरणात असणाऱ्यांसाठी वेगळी सुविधा असावी, त्यांचा डॉक्टरांशी फोनवरुन नेहमी संपर्क असावा. डिझास्टर मॅनेटमेंट ऑथोरेटी यासंबंधी आवश्यकतेनुसार निर्णय घेऊ शकते.
-मायक्रो कंटेंमेंट झोनमध्ये असलेल्या सोसायटीच्या बाहेरील भागाची नियमीत स्वच्छता व्हावी, तसेच वारंवार सॅनिटायझेशन करण्यात यावे.
- सरकारने जारी केलेल्या एसओपीचे पालन होत आहे का, हे पाहण्याची जबाबदारी DMA आणि मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या लोकांची असेल
- सोसायटीमध्ये कोरोना नियमांचे पालन होत नसल्याचे DMA ला आढळून आल्यास तो 10 हजारांचा दंड लावू शकतो, तसेच वारंवार तीच कृती होत असल्यास जास्तीचा दंड आकारण्याचा अधिकार DMA ला असेल.
-औषधं, दूध किंवा इतर ऑनलाईन मागवण्यात आलेले सामान, एका विशिष्ठ ठिकाणी ठेवण्यात यावे. तसेच मोलकरीन किंवा ड्रायव्हर हे सोसायटीच्या बाहेर राहत असतील तर त्यांना परवानगी नसेल
- स्विमिंग पूल, जीम आणि सार्वजनिक ठिकाणं बंद असतील, खासगी वाहनाने प्रवासाला पूर्णपणे बंदी असेल
-सोसायटीमध्ये 10 दिवसांत कोरोना एकही रुग्ण आढळून न आल्यास पुढील निर्णय घेण्यात येईल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.