२२ डिसेंबरला विशेष ग्रामसभा! हागणदारीमुक्त गावांसाठी ग्रामसेवक रडारवर; शौचालयांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबरची डेडलाईन

‘स्वच्छ भारत मिशन’च्या कामाशी पंधराव्या वित्त आयोगाचा निधी लिंक केला आहे. शौचालयांची पूर्ण न करणाऱ्या ग्रामसेवकांना यापूर्वी दोनवेळा लेखी नोटीस दिली असून आता एक जरी शौचालय मागे ठेवल्यास संबंधित ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखली जाणार आहे.
Grampanchayat
Grampanchayatesakal
Updated on

सोलापूर : ‘स्वच्छ भारत मिशन’च्या कामाशी पंधराव्या वित्त आयोगाचा निधी लिंक केला आहे. शौचालयांची कामे पूर्ण न करणाऱ्या ग्रामसेवकांना यापूर्वी दोनवेळा लेखी नोटीस दिली असून आता एक जरी शौचालय मागे राहिल्यास संबंधित ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखली जाणार आहे. तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या ग्रामसेवकांची नोंद सेवा पुस्तकात घेणार असल्याचा इशारा सीईओ आव्हाळे यांनी दिला आहे.

केंद्र शासनाच्या सूचनांनुसार ‘स्वच्छ भारत मिशन’ (ग्रामीण) अंतर्गत हागणदारी मुक्त गावाचे ध्येय साध्य करण्यासाठी गाव स्तरावर वैयक्तिक शौचालय व सार्वजनिक शौचालयांची बांधकामे तसेच सांडपाणी-घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण करून गावे शाश्वत करण्यासाठी राज्यात ३० ऑक्टोबरपासून विशेष स्वच्छता अभियान राबविले जात आहे.

या अभियानांतर्गत ज्या कुटुंबाने शौचालय बांधलेले नाही, अशा कुंटुबाची यादी तयार करून त्यांना शौचालय बांधकामाचा लाभ द्यावा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी वैयक्तिक शोषखड्डे करण्यावर भर देणे, घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे, तसेच प्‍लास्टिक संकलनासाठी सेग्रीकेशन शेड, कचरा उचलण्‍यासाठी ट्राय सायकल उपलब्ध करण्यासाठी गटविकास अधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांनी तालुक्यातील गावे प्रत्येकाला दत्तक द्यावीत. ४० दिवसांत अभियानातून गावे शाश्वत स्वच्छ करावीत, असेही सीईओ आव्हाळे यांनी स्पष्ट केले आहे. अभियान यशस्वी होण्यासाठी अधिकारी व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी केले आहे.

२२ डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभा

‘हागणदारी मुक्त गाव’साठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतीत २२ डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभा होणार आहे. यावेळी नव्याने शौचालय बांधणाऱ्या लाभार्थ्यांच्या नावास मान्यता देणे, तसेच शौचालय बांधकामासाठी प्रबोधन करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरवात करणे, ३१ डिसेंबरपूर्वी शौचालय बांधकाम होण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करणे, १ जानेवारी २०२४ नंतर गावात एकही कुटुंब उघड्यावर शौचास जाणार नाही, यादृष्टीने ठोस उपाययोजना करण्यासंदर्भातील नियोजन होईल. ‘हागणदारीमुक्त अधिक’साठी लागणारे ठराव, व्हिडिओ चित्रीकरण यासंदर्भातही या ग्रामसभेत ठराव अपेक्षित आहेत.

ठळक बाबी...

  • - शौचालयाचा नियमित वापर होण्यासाठी बांधकाम तांत्रिकदृष्ट्या योग्य असावे. बांधकाम योग्य होत असल्याची खात्री करण्यासाठी ग्रामसेवक, विविध स्तरावरील तांत्रिक अधिकारी, शाखा विस्तार, विस्ताराधिकारी, तालुका समन्वयक व समूह समन्वयक ग्रामपंचायतीतील कामांची पाहणी करतील.

  • - जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून सर्व गावांची पडताळणी होईल, हागणदारी मुक्त गावासाठी आता तगडे नियोजन.

  • - गाव स्वच्छतेसाठी ४० दिवसांचे अभियान महत्त्वाचे असून अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांचेही सहकार्य घेतले जाणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()