मुंबई : प्रसिद्ध अमेरिकन उद्योजक, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीचे मालक एलॉन मस्क यांनी नुकतीच सोशल मीडियातील लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग साईट 'ट्विटर' विकत घेतली आहे. दरम्यान, जगभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यातच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील मस्क यांचे अभिनंदन केले असून आशावादही व्यक्त केला आहे. (special post by Jitendra Awhad for Elon Musk who owned Twitter Inc)
"विचारस्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते उद्योजक एलॉन मस्क यांनी ४४ बिलियन डॉलर्स देऊन ट्विटर विकत घेतलं आहे. अभिनंदन आणि आशावाद!" असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्यानं आता लोकांच्या विचारस्वातंत्र्याचं रक्षण केलं जाईल, त्यामुळं हे आशादायी चित्र असल्याचं मत आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे.
ट्विटर आणि एलॉन मस्क यांच्याबद्दलच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होत्या. एलॉन मस्क यांनी ४३ अब्ज डॉलर्स किंमतीला ट्विटर खेरदी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यावरून बराच वादही झाला होता. मस्क यांच्याशी वाटाघाटीदरम्यानच कंपनी आणखी चांगल्या प्रस्तावांच्या शोधात होती. पण अखेर एलॉन मस्क यांचाच प्रस्ताव ट्विटरनं स्विकारला. बोलण्याचं स्वातंत्र्य मिळण्यासाठी कंपनीचं खासगीकरण होणं गरजेचं असल्याचं मस्क यांनी म्हटलं होतं.
ट्विटरमध्ये ९ टक्के भागीदार असलेल्या मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. कारण एवढ्या भागीदारीमुळे त्यांना आवश्यक ते बदल करता येणं शक्य नव्हतं. ट्विटर खरेदी केल्यानंतर आपल्या ट्विटमध्ये एलॉन मस्क म्हणाले, "लोकशाहीसाठी भाषण स्वातंत्र्य अतिशय महत्त्वाचं आहे. पण ट्विटर या तत्त्वांचं पालन करतं की नाही, याबद्दल खात्री नाही. आपण ट्विटरमध्ये अनेक नवे फीचर्स आणणार आहोत तसंच अल्गोरिदम्स, बॉट्समध्येही बदल करणार आहोत. ट्विटरमध्ये मोठी क्षमता असून युजर्सना त्यांची क्षमता पूर्णपणे वापरता येईल याची खबरदारी घेतली जाईल"
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.