VBA Loksabha: लोकसभेसाठी 'वंचित'च्या हालचालींना वेग; राज्य कार्यकारिणीची बोलावली तातडीची बैठक

महाविकास आघाडी तसेच इंडिया आघाडीनं वंचितला सोबत घेण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkarsakal
Updated on

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारला सत्तेपासून दूर करण्याकरता येत्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची मोट बांधली आहे. या आघाडीत सामिल होण्यास वंचित बहुजन आघाडी इच्छुक आहे, पण या आघाडीनं त्यांना अद्याप कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही.

त्यामुळं वंचितकडून आता लोकसभेची तयारी सुरु करण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी यासाठी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची उद्या बैठक बोलावली आहे. यामध्ये ३० जागांवर लढण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Speed up movement of VBA for Lok Sabha election an emergency meeting has been called)

Prakash Ambedkar
Shinde-Pawar: "महाराष्ट्र मंबाजी-तुंबाजींचा नाही"; मोदींचं कौतुक करणाऱ्या शिंदे-पवारांवर शिवसेनेचं टिकास्त्र

उद्या बोलावली तातडीची बैठक

माध्यमांतील वृत्तानुसार, वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक उद्या पार पडणार आहे. या बैठकीला कार्यकारिणीतील सर्व सदस्यांना हजेरी लावण्याचे आदेश प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. गेल्या २० दिवसांतील ही पक्षाची दुसरी बैठक आहे. या बैठकीत ३० जागांवर निर्णयाची शक्यता वर्तवली जात आहे. (Marathi Tajya Batmya)

Prakash Ambedkar
Mumbai: पोलिसांमुळं हिंदू महिलेवर दररोज बुरखा घालण्याची वेळ; मुंबईतील महिलेवर ओढवलाय बिकट प्रसंग

लोकसभेच्या ३० जागांवर होणार निर्णय?

प्रकाश आंबेडकर यांनी कालच राष्ट्र सेवा दलाच्या कार्यक्रमात बोलताना आपला मानस बोलून दाखवला होता. इंडिया आघाडीची जर वंचितला सोबत घेण्याची इच्छा नसेल तर आम्ही लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवण्याची तयारी सुरु करत आहोत असं त्यांनी म्हटलं होतं. यापार्श्वभूमीवर आता वंचितची उद्या बैठक पार पडणार आहे. (Latest Marathi News)

Prakash Ambedkar
Multibagger stock: 3 वर्षात झाली 15 पट वाढ, 'या' शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल

जाहिररित्या पत्रव्यवहार केला

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत अनुक्रमे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीसोबत जाण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं जाहिररित्या पत्रव्यवहार करुन इच्छा व्यक्त केली होती. त्यावर दोन्ही आघाड्यांमधील नेत्यांकडून प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याबाबत विचार सुरु असल्याचं म्हटलं होतं पण अद्याप यावर ठोस निर्णय होऊ शकलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.