सोलापूर: दहावी अनुत्तीर्ण झालात म्हणून निराश होऊ नका. आयुष्याच्या शैक्षणिक टप्यावर येथे आलेले अपयश तुम्हाला नक्की पुसून काढता येईल. या परीक्षेत अपयश झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे अपयश पुसून काढण्यासाठी अनेक संधी पुढील काळात उपलब्ध आहेत. त्यासाठी फक्त नव्याने सकारात्मक भावनेतून ध्येयासाठीचा नवा विचार सोबत घेऊन पुढे जाण्याची गरज आहे.
दहावी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त दोन विषयात अनुत्तीर्ण झाला असेल अकरावीला एटीकेटी आधारावर प्रवेश मिळू शकतो. सुरवातीला लगेच जुलै महिन्यात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे.
या परीक्षेत ते लगेच उर्वरित विषयात उत्तीर्ण होऊ शकतात. याही परीक्षेत संधी मिळाली नाही तरी ते अकरावीला एटीकेटी आधारावर प्रवेश घेऊ शकतात. त्यामुळे त्यांचे शैक्षणीक वर्ष वाया जाणार नाही. त्यांना जुलै नंतर फेब्रुवारीत दुसऱ्यांदा दहावी परीक्षेची संधी मिळणार आहे.
या दोन्ही संधीचा वापर केला तर त्याचे शैक्षणीक वर्ष वाया जाणार नाही. ही संधी जास्तीत तीन विषय दहावी परीक्षेत अनुत्तीर्ण झाले तर असणार आहे. या स्थितीचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.
अनेक वेळा दहावीला अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नंतरच्या शैक्षणीक जीवनात मोठे यश मिळवल्याची शेकडो उदाहरणे आहेत. हे अपयश निश्चितपणे पुढे यशात रुपांतरीत होऊ शकते याचा अनुभव सातत्याने आजूबाजूच्या जीवनात येत असतो. तसेच दोन विषयापेक्षा अधिक
विषयात अनुत्तीर्ण झाले तर आधी जुलै महिन्यातील परीक्षेत यश मिळवून अकरावीला प्रवेश घेता येतो.
काही ठळक बाबी...
राज्यातून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या सव्वा लाखाच्यावर
महात्मा गांधी, अल्बर्ट आइन्स्टाईन, व्ही. शांताराम, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन यांनी आपल्यासारखे अपयश पचवून पुढे यश मिळविले
उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला आवडेल त्या क्षेत्रात करिअर केले तर अपयश संपते.
‘सर्टिफिकेट कोर्स इन महाराष्ट्र’ या संकेतस्थळावर ८५ अभ्यासक्रमाची माहिती मिळते. त्यातील एक कोर्स निवडून त्यात प्रावीण्य मिळवता येते.
दहावी नापास झाले तरी मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी शिक्षणक्रम पूर्ण करून विद्यापीठाच्या पहिल्या वर्षाच्या बीए, बीकॉमसाठी प्रवेश मिळविता येतो.
आयटीआयमध्ये काही कोर्सेस उपलब्ध आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.