एसटीतील खासगीकरणाच्या विरोधात कास्ट्राईबचे राज्यभर आंदोलन

जिल्हाधिकारी आणि विभाग नियंत्रकांना दिले निवेदन
Strike
StrikeSakal media
Updated on

मुंबई : कास्ट्राईब एसटी कर्मचारी संघटनेने (ST bus employee union) एसटी महामंडळातील खाजगीकरणाच्या विरोधात (privatization) आणि जुलै महिन्याचा पगार देण्यात (July salary) यावा या मागणीसाठी राज्यभर आंदोलने (strike) करण्यात आले. दरम्यान आपल्या प्रलंबित मागण्यांनाचे निवेदन जिल्हाधिकारी (collector) आणि एसटीच्या विभाग नियंत्रकांना देण्यात आले. पहिल्या टप्यात एसटी महामंडळ 500 साध्या बसेस भाडेतत्वावर (on rent basis) घेणार असल्याने कास्ट्राईबने या आंदोलनाची हाक दिली होती.

Strike
पाश्चिम उपनगरात सुविधा वाढवण्यावर भर ; 'या' रुग्णालयात 63 'ICU' बेड

एसटी महामंडळाने खासगीकरणाच्या दिशेने सुरुवात केली असून, खाजगी कंत्राटदारांकडून भाडेतत्त्वावर साध्या बसेस घेण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये खाजगी गाड्या चालविण्यासाठी खासगी चालक ठेवण्यात येणार आहे. तर गाड्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी सुद्धा खाजगी कंत्राटदार नेमून एसटी महामंडळाच्या मालकीची जागा त्यांना देखभाल दुरुस्तीसाठी दिल्या जाणार आहे. एसटी महामंडळाच्या तीन मध्यवर्ती कार्यशाळेत स्वमालकीच्या बसेस बांधून घेण्याऐवजी खाजगी गाड्या घेण्याचा निर्णय घेतल्याने महामंडळाचे खासगीकरण करून वाटोळं केलं जातं असल्याचा आरोप कास्ट्राईब एसटी कर्मचारी संघटनेने केला आहे.

त्यामुळे महामंडळातील खासगीकरण थांबवावे, जुलै महिन्याचा पगार तातडीने द्यावा, शिवाय वेतन वाढीचा दर व घरभाडे भत्ता दर वाढविण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि महागाई भत्ता वाढ करून त्याचा मागील फरक तातडीने देण्यात यावा, पुढच्या 2020-2024 च्या कामगार कराराच्या पोटी हंगामी पगार वाढ जाहीर करावे अशी मागणी कास्ट्राईब एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनिल निरभवणे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.