ST Bus Viral Video: कंडक्टर आहे की जिमनॅस्ट? तिकीट काढण्यासाठी एस्टीत करावा लागतोय द्राविडी प्राणायाम!

ST Bus Viral Video: एस टी बसमध्ये तिकीट काढण्यासाठी वाहक करत असलेल्या कसरतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
ST Bus Viral Video
ST Bus Viral Videoesakal
Updated on

ST Bus Viral Video: एस टी बसमध्ये तिकीट काढण्यासाठी वाहक करत असलेल्या कसरतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. प्रवाशांसोबत वाहकाचे होत असलेले हाल महाराष्ट्रासमोर आले.

ग्रामीण विभागात आजही बसेसेचाचा मोठा तुटवडा आहे. त्यामुळे बसेसेसमध्ये प्रवाशांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अहेरी ते सिरोंचा एसटीचा प्रवास सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ST Bus Viral Video
Anant Radhika grand pre-wedding : प्री वेडिंगलाच अडीच हजारांहून जास्त डिशेस तर लग्नात काय? 'मेन्यू' ची रंगतेय चर्चा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या यवतमाळ दौऱ्यावर आहेत. त्यामुळे विविध आगारातून बसेस पाठविण्यात येत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगारातून १० बसेस पाठविण्यात आल्याने बसेसचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

ST Bus Viral Video
Who Is Captain Prashant Nair : कोण आहेत ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर? ज्यांच्या नेतृत्वात अंतराळात जाणार 'गगनयान मिशन'

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये अनेक विकास प्रकल्पांची घोषणा करणार आहेत. यासोबतच ते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारालाही सुरुवात करणार आहेत. या मालिकेत पंतप्रधान मोदी यवतमाळमध्ये महिला बचत गटांना संबोधित करणार आहेत. या गटांमध्ये काम करणाऱ्या काही महिलांशीही तो संवाद साधणार आहे.

पंतप्रधान संपूर्ण महाराष्ट्रात 5.5 लाख महिला बचत गटांना 825 कोटी रुपयांचा 'फिरता निधी' वितरित करतील. ही रक्कम राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (NRLM) अंतर्गत भारत सरकारने प्रदान केलेल्या निधीव्यतिरिक्त आहे. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पीएम मोदींच्या या प्रयत्नाकडे 'महिला कार्ड' म्हणून पाहिले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()