एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला (ST Employee Salary) पगार 24 तासात होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारकडून २२३ कोटी मंजूर करण्यात आले आहेत.(ST Employee Salary 223 crore sanctioned)
राज्यातील जवळपास ९० हजार एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही. दर महिन्याच्या दहा तारखेला होणारा पगार १६ तारीख उजाडली तरी झाला नसल्याने एसटी कर्मचारी तणावात आहेत.
दरम्यान, राज्यसरकारने मोठा निर्णय घेत पगारासाठी २२३ कोटी मंजूर केले आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे डिसेंबर, 2022 देय जानेवारी, 2023 च्या वेतनासाठी सन 2022-23 मध्ये गृह (परिवहन) विभागाच्या 2041 0018- 33, अर्थसहाय्य लेखाशिर्षाखाली केलेल्या तरतूदीमधून रू.223.00 कोटी (अक्षरी रूपये दोनशे तेवीस कोटी फक्त) एवढी रक्कम रोखीने प्रदान करण्यास मान्यता देण्यात येत आहे. असे परिपत्रकात माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, पगार न झाल्याने सांगलीत एसटी कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली होतीे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
महाआघाडी सरकारच्या काळात संप करून सरकारला जेरीस आणणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचा प्रश्न अजून मिटला नसल्याचे प्रयत्यास आले आहे. यापूर्वी आर्थिक विवंचनेतून व सरकारी नोकरीच्या दर्जा देण्याच्या मागणीतून अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आपले आयुष्य संपवले आहे. आता शिंदे-फडणवीस सरकारच्या काळातील एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची पहिली घटना समोर आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.