मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला येत्या १ जुन रोजी ७५ वर्ष पुर्ण होत असून, अमृत महोत्सवात पदार्पण करत आहे. मात्र, त्यानंतरही प्रवाशांच्या दृष्ट्रीने पाहिजे त्या सुविधा अद्याप दिसून येत नाही. एसटीचे सुरक्षीत प्रवासाचे ब्रिद वाक्य प्रत्यक्षात उतरत नसून, देशातील १४ सार्वजनिक एसटी महामंडळाच्या अपघाताची संख्या बघता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्यात सर्वाधिक अपघात असल्याची माहिती पुढे आली आहे. १ मे २०२२ ते ३० एप्रिल २०२३ पर्यंतची अपघाताची आकडेवारी बघता आतापर्यंत एकूण ३०१४ अपघात झाले असून, त्यामध्ये ३४३ प्रवाशांचा मृत्यु झाला आहे. तर ३५८४ प्रवासी जखमी झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
सध्या स्थितीत एसटी महामंडळाकडे फक्त १३ हजार बसेस असून, त्यामधूनच राज्यातील ६५ लाख प्रवाशांची वाहतुक करण्याची कसरत सुरू आहे. नादुरूस्त, भंगार खिळखिळ्या बसेस सुद्धा रस्त्यांवर सोडण्यात आल्या आहे. एसटीच्या कार्यशाळेत अत्यंत दर्जाहीन जुगाड करून बसेस प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यांवर सोडल्या जात असल्याने प्रवाशांचा जिव धोक्यात टाकला जात आहे. सोमवारी गोंदीयात धावत्या बसचे चाक निखळून पडाल्याची घटना घडली असून, दुसरीकडे माळशेज घाटात एसटी आणि ट्रकच्या अपघातात प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मात्र,त्यानंतरही एसटी महामंडळ प्रशासनाकडून या घटनांची गंभीर दखल घेतली जात नसल्याने, त्याच त्या बसेस रस्त्यांवर येत आहे. गेल्या एक वर्षात एकूण ३०१४ अपघातामध्ये २८३ प्राणांतीक अपघात झाले आहे. तर १३६९ गंभीर अपघात झाले आणि १३६२ किरकोळ अपघात झाले असून, ०.१८ चा अपघाताचा दर असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये ३४३ मृत्यु, २४५० किरकोळ दुखापती आणि ११३४ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, असे एकूण ३५८४ प्रवासी वर्षभरात जखमी झाल्याची माहिती एसटी महामंडळ प्रशासनाने दिली आहे.
यावर्षात पाच महिन्यात एसटीचे गंभीर अपघात
- ९ मे रोजी मुंबई गोवा महामार्गावर एसटी बस अन् डंपरचा भीषण अपघात १८ जण जखमी
- ३ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी बस आणि टेम्पोचा भीषण अपघात एकाचा मृत्यू, १० जणांची प्रकृती चिंताजनक
- १८ फेब्रुवारी रोजी एसटी बस, कारचा भीषण अपघात, मुख्याध्यापकास दोन जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
- ७ एप्रिल रोजी नाशिकमध्ये एसटी बसला भीषण अपघात, महिला कंडक्टरचा जागीच मृत्यू, २२ प्रवासी गंभीर जखमी
- २३ मे रोजी ट्रक आणि एसटीचा अपघात ८ जणांचा मृत्यु १३ जण जखमी
- १० मे रोजी वर्धा-नागपूर मार्गावर तीन एसटीचा विचित्र अपघात; २० प्रवासी जखमी
- २८ एप्रिल रोजी पुणे- शिंदखेडा एसटी बस उलटल्याने चौघे जखमी
एसटी बसेस पेटण्याच्या घटना
- १ मे रोजी पुसद आगाराची बस नेर शहरातून जात असताना अचानकपणे बसच्या वायरींग ने पेट घेतला.
- ४ एप्रिल रोजी नाशिक मध्ये शिवशाही बस पेटली
- ४ एप्रिल रोजी नागपुर महामार्गावर कोंढाळीजवळ धावती शिवशाही बस पेटली
- ३० एप्रिल रोजी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धावती बस पेटली
- १८ जानेवारी रोजी शहादा ते मुंबई जाणाऱ्या राहुड घाटात धावती बस पेटली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.