सोलापूर - गेली पाच ते सहा वर्ष अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला भविष्यात सुगीचे दिवस येतील अशा रितीने एसटीची आर्थिक घोडदौड चालू असून, जुलै महिन्यात ३१ विभागांपैकी १८ विभागांनी नफा कमवला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाचा तोटा २२ कोटी इतका नाम मात्र झालेला आहे.