मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या (St strike) संपाचा आज पाचवा दिवस आहे. एसटीचे शासनामध्ये विलिनिकरण करण्याची मागणी एसटी कर्मचाऱ्यांना लावून धरली आहे. हा संप आता चिघळत चालला आहे. बुधवारी कर्मचारी मंत्रालयावर (Mantralaya) धडकणार होते मात्र त्यांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे.
जवळपास 300 कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. पहिल्या दिवशी 376 कामगारांवर निलंबनाची कारवाई झाली होती. दुसऱ्या दिवशी 542 कर्मचाऱ्यांवर निलंबन कारवाई करण्यात आली होती.
आता सरकारकडून संप मागे न घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तरीही कर्मचाऱ्यांकडून आंदोलन सुरु आहे. आज संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. "कोणताही प्रश्न सोडवत असताना त्याला आत्महत्या करणं हा पर्याय नाही, त्यामुळं कुणीही आत्महत्येचं पाऊल उचलू नये" असं आवाहन त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलंय.
आज 1 लाख कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही मनसे अध्यक्षांची भेट घेतली. याप्रश्नी राज ठाकरेंनी आम्हाला पाठिंबा दिला असू मी लक्ष घालेन" असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलंय. त्यामुळं राज्य सरकार आमच्या मागणीचा विचार करुन आम्हाला न्याय देईल, अशी अपेक्षाही एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.