ST Worker Samp Swargate: पुण्याहून एसटी प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, स्वारगेटवरून धावताहेत फक्त 'इतक्या' गाड्या

ST Worker Samp Swargate: संपाच्या पहिल्या दिवशी स्वारगेट बस स्थानकात कर्मचाऱ्यांनी बंद पाळला होता. यावेळी अतिरिक्त पोलीस बळही तैनात करण्यात आले होते.
ST Worker Samp Swargate
ST Worker Samp SwargateEsakal
Updated on

राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. एसटी बसचे हजारो कर्मचारी संपावर गेल्यामुळे गणेशोत्सवापूर्वी गणेशभक्तांचे प्रचंड हाल होत आहेत. कारण उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त एसटी बसने गावी जातात.

राज्य सरकारने पगार वाढवून इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर सुविधा द्याव्यात, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

काल सुरू झालेल्या या संपामुळे पहिल्या दिवशी राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय झाल्याची परिस्थिती होती.

दरम्यान पुण्याहून प्रवास करणाऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी आहे. कारण पुण्याच्या स्वारगेट स्थानकातून काही गाड्यांची ये जा सुरू झाली आहे.

काय आहे स्वारगेट स्थानकाची स्थिती?

संपाच्या पहिल्या दिवशी स्वारगेट बस स्थानकात कर्मचाऱ्यांनी बंद पाळला होता. यावेळी अतिरिक्त पोलीस बळही तैनात करण्यात आले होते.

दरम्यान नुकतेच हाती आलेल्या माहितीनुसार स्वारगेट स्थानकातून काही गाड्यांची ये जा सुरू झाली आहे. पण काही मार्गावर धावणाऱ्या बस अजूनही बंद आहेत. आज स्वारगेट स्थानकावरून जवळपास 60 टक्के गाड्या सुरू झाल्या असून, 40 टक्के गाड्या अजूनही बंद आहेत.

ST Worker Samp Swargate
ST E-Ticket Refund: एसटी संपामुळे ई-तिकीट रद्द केल्यास पैसे परत मिळणार का? वाचा काय आहे नियम

शिवनेरी आणि ई-शिवाईवर परिणाम नाही

एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असला तरी पुणे-मुंबई मर्गावर खासगी कंत्राटदारांकडून चालवण्यात येणाऱ्या शिवनेरी आणि ई-शिवाई बस संपाच्या पहिल्या दिवशी सुरळीत धावल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान काल सरकार आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या बैठकीत प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. पण त्यामध्ये कोणताही ठोस तोडगा निघाला नसल्याने कर्मचारी संप सुरूच ठेवणार आहेत.

ST Worker Samp Swargate
PMC Recruitment : पुण्यात हवी सरकारी नोकरी? महापालिकेत आली मेगा भरती, ६८२ पदांसाठी जाहीरात; असा करा अर्ज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.